OTT Release This Week : प्रेक्षकांना मनोरंजनाचा पूर्ण डोस देण्यासाठी निर्माते आता कोणतीही कसर सोडत नाहीत. एखादा चित्रपट किंवा वेब सीरिज संपताच नवीन रिलीजची तयारी केली जाते. ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि थिएटरमध्ये दर आठवड्याला काहीतरी नवीन दाखवले जात आहे, जेणेकरून प्रेक्षकांना कंटाळा येऊ नये.
९ ते १५ जूनपर्यंत मनोरंजनाचा जबरदस्त डोस मिळाल्यानंतर आता १६ ते २२ जूनदरम्यान गुन्हेगारी, ऐतिहासिक, कॉमेडी आणि थ्रिलर अशा सर्व शैलींचे दमदार चित्रपट आणि सीरिज प्रेक्षकांसाठी प्रदर्शित होत आहेत.
जूनचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे आणि या आठवड्यात काही चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत, तर काही येत्या काळात स्ट्रीम करण्यासाठी सज्ज आहेत. या आठवड्यात कोणते नवीन चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर रिलीज होणार आहेत ते जाणून घेऊया.
ग्राउंड झिरो (Ground Zero)
इमरान हाश्मीचा ‘ग्राउंड झिरो’ हा चित्रपट २५ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि आता हा चित्रपट ओटीटीवर आपली ताकद दाखवण्यास सज्ज आहे. एका वास्तविक जीवनातील घटनेवर आधारित हा चित्रपट २० जून रोजी ZEE5 मध्ये प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही तो चित्रपट पाहण्याची संधी गमावली असेल तर आता तुम्ही घरी बसून त्याचा आनंद घेऊ शकता.
केरळ क्राइम फाइल्स सीझन २ (Kerala Crime Files Season 2)
‘केरळ क्राइम फाइल्स’चा पहिला सीझन प्रचंड हिट झाला होता आणि आता निर्माते त्याचा दुसरा सीझन घेऊन येत आहेत. हा संपूर्ण सीझन एका पोलिस अधिकाऱ्याच्या बेपत्ता होण्याभोवती फिरतो, जो २० जून रोजी जिओ हॉटस्टारवर पाहता येईल.
फर्स्ट कॉपी (First Copy)
स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी सध्या त्याच्या पहिल्या वेब सीरिज ‘फर्स्ट कॉपी’मुळे चर्चेत आहे, जी या आठवड्यात डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला, जो लोकांना आवडला. ९० च्या दशकातील पायरसी व्यवसायाची कहाणी ‘फर्स्ट कॉपी’मध्ये पाहायला मिळेल. २० जून रोजी एमएक्स प्लेअरवर ती पाहता येईल.
प्रिन्स अँड फॅमिली (Prince and Family)
‘प्रिन्स अँड फॅमिली’ हा बिंटो स्टीफन दिग्दर्शित एक मल्याळम कौटुंबिक कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. तुम्हाला त्याची कथा खूप आवडेल आणि हा दक्षिण चित्रपट उद्या म्हणजे २० जून रोजी OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर पाहता येईल.
डिटेक्टिव्ह शेरदिल (Detective Sherdil)
बनिता संधू, बोमन इराणी, सुमित व्यास आणि दिलजीत दोसांझ स्टारर ‘डिटेक्टिव्ह शेरदिल’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या नावावरूनच त्याची कथा एका डिटेक्टिव्हभोवती फिरणार असल्याचा अंदाज लावता येतो. हा चित्रपट उद्या म्हणजेच २० जून रोजी झी ५ वर प्रदर्शित होणार आहे.
द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन ३ (The Great Indian Kapil Show Season 3)
पहिले दोन सीझन हिट झाल्यानंतर कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा त्याच्या लोकप्रिय कॉमेडी शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा तिसरा सीझन घेऊन येत आहे, जो पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील खूप उत्सुक आहेत. या शोचा पहिला पाहुणा सलमान खान असेल आणि हा शो २१ जून रोजी नेटफ्लिक्सवर येईल.