IIFA Digital Awards 2025: सध्या बॉलीवूडमध्ये ‘आयफा पुरस्कार २०२५’ या सोहळ्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुख खान, माधुरी दीक्षित, कार्तिक आर्यन, तमन्ना भाटिया असे बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी ‘आयफा पुरस्कार’ सोहळ्यासाठी जयपुरला पोहोचले. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नुकताच ‘आयफा डिजिटल पुरस्कार २०२५’ सोहळा पार पडला. शनिवारी, ८ मार्चला रात्री ‘आयफा डिजिटल पुरस्कार’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट, वेब सीरिज यांना गौरविण्यात आलं. ‘आयफा डिजिटल पुरस्कार’ सोहळ्यातील विजेत्यांची यादी समोर आली आहे? या पुरस्कार सोहळ्यात कोणत्या चित्रपट, वेब सीरिजने बाजी मारली आणि कोणत्या कलाकाराला कोणत्या पुरस्काराने गौरविण्यात आलं? जाणून घ्या…

‘आयफा डिजिटल पुरस्कार २०२५’मध्ये यंदाची सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘अमर सिंह चमकीला’ आणि वेब सीरिज ‘पंचायत सीझन ३’ ठरली. तर क्रिती सेनॉनला ( दो पत्ती चित्रपट ) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसंच विक्रांती मॅसीला ( सेक्टर ३६ चित्रपट ) सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने गौरविण्यात आलं.

चित्रपट विभाग

सर्वोत्कृष्ट चित्रपट – अमर सिंह चमकीला
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – क्रिती सेनॉन ( दो पत्ती )
सर्वोत्कृष्ट अभिनेता – विक्रांत मॅसी ( सेक्टर २६ )
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – इम्तियाज अली ( अमर सिंह चमकीला )
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – अनुप्रिया गोयंका ( बर्लिन )
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – दीपक डोबरियाल ( सेक्टर ३६ )
सर्वोत्त्कृष्ट मूळ कथा – कनिका ढिल्लों ( दो पत्ती )

वेब सीरिज विभाग

सर्वोत्कृष्ट वेब सीरिज – पंचायत सीझन ३
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – श्रेया चौधरी ( बंदिश बँडिट्स सीझन २ )
सर्वोत्कृष्ट अभिनेता – जितेंद्र कुमार ( पंचायत सीझन ३)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – दीपक कुमार मिश्रा ( पंचायत सीझन ३)
सर्वोत्त्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – संजीदा शेख ( हीरामंडी: द डायमंड बाजार )
सर्वोत्त्कृष्ट सहाय्यक अभिनेता – फैसल मलिका ( पंचायत सीझन ३)
सर्वोत्कृष्ट मूळ कथा – कोटा फॅक्ट्री सीझन ३

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतर पुरस्कार

सर्वोत्कृष्ट रिॲलिटी किंवा नॉन-स्क्रिप्टेड शो – फॅब्युलस लाइव्स VS बॉलीवूड वाइव्स
सर्वोत्कृष्ट माहितीपट/डॉक्यु-फिल्म – यो यो हनी सिंह: फेमस
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत – अनुराग सॅकिया, इश्क है ( मिसमॅच्ड )