Param Sundari OTT Release : जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्राचा ‘परम सुंदरी’ हा चित्रपट २९ ऑगस्ट २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. बऱ्याच लोकांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला असेल, पण ज्यांनी पाहिला नव्हता ते आता ओटीटीवर परम सुंदरी पाहू शकतील. उत्तर भारतीय मुलगा व दक्षिण भारतीय मुलगी यांच्या लव्ह स्टोरीवर बेतलेला हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे ते जाणून घेऊया.
बॉलीवूडमध्ये रोमँटिक-कॉमेडी चित्रपट लोकप्रिय आहेत. लोकांनाही असे हलके-फुलके चित्रपट पाहायला आवडतात. रोमँटिक चित्रपटात विनोदाचा तडका असेल तर मनोरंजन होणार हे मात्र नक्की. थिएटर रिलीजनंतर आता सिद्धार्थ-जान्हवीचा परम सुंदरी ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.
तुषार जलोटा दिग्दर्शित, परम सुंदरी सिनेमाची निर्मिती मॅडॉक फिल्म्सने केली आहे. परम सुंदरीमध्ये, सिद्धार्थ मल्होत्रा परमच्या भूमिकेत आहे, जो दिल्लीतील डेटिंग अॅपमध्ये पैसे गुंतवतो. नंतर त्या अॅपची चाचणी करण्यासाठी स्वतः अॅपद्वारे जोडीदार शोधण्याचा निर्णय घेतो. यादरम्यान तो केरळमधील सुंदरीला (जान्हवी कपूर) भेटतो. त्यानंतर चित्रपटात त्यांची प्रेम कहाणी आणि त्यांच्या नात्यात येणाऱ्या अडचणी दाखवल्या जातात.
कुठे पाहायचा परम सुंदरी?
थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर, आता परम सुंदरी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. आज २४ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर ५.५ रेटिंग मिळाले आहे. चित्रपटाचे रेटिंग कमी आहे, पण जर तुम्हाला रोमँटिक चित्रपट पाहायला आवडत असतील तर तुम्ही परम सुंदरी पाहू शकता. कारण या चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर हिंदीमध्ये उपलब्ध आहे.
जान्हवी कपूर व सिद्धार्थ मल्होत्रासह चित्रपटात इतर अनेक लोकप्रिय कलाकार आहेत. संजय कपूरने परमच्या वडिलांची भूमिका केली केली. तसेच राजीव खंडेलवाल, आकाश दहिया, रेंजी पानिकर, तन्वी राम, मनज्योत सिंग, नंदन थंपी हे कलाकारही चित्रपटात विविध भूमिकांमध्ये आहेत.
