भारतातील लाखो प्रेक्षकांचं मनोरंजन करून झाल्यानंतर नव्या उत्साहात नव्या शीर्षकासह कपिल शर्मोने ओटीटीवर पदार्पण केलंय. ३० मार्च रोजी कपिलच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ची सुरुवात झाली. पहिल्याच एपिसोडमध्ये रणबीर कपूर, नीतू कपूर आणि रिधिमा कपूर यांनी हजेरी लावली होती. बघता बघता या शोचे पाच भाग पूर्णदेखील झाले आहेत.

या कॉमेडी शोच्या दुसऱ्या भागात क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरने हजेरी लावली होती. तर नुकताच प्रदर्शित झालेला ‘अमरसिंग चमकिला’ या चित्रपटाचे कलाकार तिसऱ्या भागात आले होते. परिणीती चोप्रा, इम्तियाज अली, दिलजीत दोसांझ यांनी चित्रपटाच्या प्रमोशन्ससाठी उपस्थिती दर्शविली होती.

हेही वाचा… थरारक चित्रपट ‘शैतान’ आता येणार ओटीटीवर; वाचा कधी व कुठे पाहता येणार?

बॉलीवूडचा स्टार विकी कौशल आणि त्याचा भाऊ सनी कौशल याने चौथ्या भागात हजेरी लावली होती. तर पाचव्या भागात मिस्टर परफेक्शनीस्ट आमिर खान उपस्थित होता.

‘द कपिल शर्मा’ शोच्या यशानंतर ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ची सुरुवात झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कपिल शर्माच्या मानधनात ५२५% ची वाढ झाली आहे. माहितीनुसार एका एपिसोडसाठी कपिल शर्मा ५-५ कोटींचं मानधन घेतो.

हेही वाचा… “तुझं करिअर संपेल,” एका सहकलाकाराने परिणीती चोप्राला ‘चमकीला’ चित्रपट न करण्याचा दिलेला सल्ला; अभिनेत्री म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या कॉमेडी शोमध्ये कपिल शर्मा, सुनिल ग्रोवर, राजीव ठाकुर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक असे विनोदवीर प्रेक्षक आणि कलाकारांच मनोरंजन करताना दिसतायत. तर अर्चना पुरण सिंगदेखील या शोमध्ये आहेत.