दिग्दर्शक, निर्माता करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा चॅट शो नेहमीच चर्चेत असतो. करण जोहरच्या या शोमधून अनेक सेलिब्रेटींची वैयक्तीक आणि खासगी गुपितं उघड होतात. या शोचा ७ वा सीझन नुकताच डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित झाला. तसंच हा शो इतरही वेगवेगळ्या कारणांनी सोशल मीडियावर चर्चेत राहिला आहे. पण या शोबद्दल दोन गोष्टी सर्वाधिक चर्चेत असतात ते म्हणजे शोचा ‘रॅपिड फायर राउंड’ आणि दुसरं म्हणजे रॅपिड फायर जिंकल्यानंतर मिळणारं गिफ्ट हॅम्पर. हे हॅम्पर जिंकण्यासाठी सेलिब्रेटी शोमध्ये भांडताना आणि अतिशय मजेशीर उत्तरे देताना दिसतात. पण या हॅम्परमध्ये नक्की काय असतं याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये दिलं जाणारं गिफ्ट हॅम्पर हे अनेकांसाठी कुतुहलाचा विषय आहे. कारण कोट्यवधीची संपती असलेल्या कलाकारांनाही याचा मोह आवरता येत नाही. त्यामुळे करणकडून दिल्या जाणाऱ्या या हॅम्परमध्ये नक्की असतं तरी काय हे सर्वांनाच जाणून घ्यायचं आहे. नुकत्याच एका व्हिडीओमध्ये करण जोहरने याविषयीचा खुलासा केला आहे.

आणखी वाचा- ..अन् कियाराचं नाव घेताच लाजला सिद्धार्थ मल्होत्रा, ‘झलक दिखला जा’मधला व्हिडीओ पाहिलात का?

करण जोहरने त्याच्या सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो या हॅम्परमध्ये दिलेल्या सर्व गोष्टी सांगत आहे. हिऱ्यांच्या दागिन्यांपासून ते खव्याच्या मिठाईपर्यंत अनेक वस्तू या हॅम्परमध्ये दिल्या जातात. सीझन ७ च्या हॅम्परमध्ये करण जोहरचा ज्वेलरी ब्रँड त्यानी ज्वेलरी, मार्शल एक्टन II स्पीकर्स, ऑडी एस्प्रेसो मोबाइल, अमेझॉन इको शो १०, वाहदम टी अँड टी मेकर सेट, न्यूहॉस चॉकलेट्स कलेक्शन डिस्कवरी बॉक्स, बॉम्बे स्वीट शॉप, खोया स्वीट, २८ बेकर स्ट्रीट, कॉफी विथ करणचा कॉफी कप ही सर्व गिफ्ट सेलिब्रिटींना दिले जातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘कॉफी विथ करण’च्या सातव्या सीझनबद्दल बोलायचं तर या सीझनमध्ये रणवीर सिंह, आल‍िया भट्ट, कतरीना कैफ, स‍िद्धार्थ मल्‍होत्रा, विक्‍की कौशल, सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्‍या पांडे, सामंथा रुथ प्रभू, अक्षय कुमार, क‍ियारा आडवाणी, शाह‍िद कपूर यांनी सहभाग घेतला होता. या कलाकारांचे एपिसोड यंदा बरेच गाजले होते.