‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये झळकल्यानंतर मनीषा रानीच्या हाती मोठा शो लागला. ती ‘झलक दिखला जा ११’ मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाली आणि विजेतीही ठरली. हा शो जिंकल्यानंतर ती पहिल्यांदाच बिहारमधील आपल्या गावी गेली. मुंगरे इथं गेल्यावर तिने कुटुंबियांबरोबर विजयाचं सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनचा तिने व्लॉग बनवला आहे.

सेलिब्रेशन केल्यानंतर मनीषाने तिला मिळालेले गिफ्ट्स तिच्या बहिणींबरोबर मिळून उघडले. यावेळी काही रोख रकमेचे लिफाफेही तिने मोजले. यावेळी मनीषाचे वडील तिथे आले आणि या बहिणींबरोबर बसले. मग त्यांनी मनिषाला मिळालेले पैसे मोजले. मनीषा म्हणाली, “आम्ही मुंगेरला आलो होतो आणि आम्ही इथे पार्टी केली होती, इथे खूप पाऊस पडत होता आणि आम्हाला वाटलं की लोक येणार नाहीत पण देवाच्या कृपेने ते सर्वजण आमच्या आनंदात झाले. सगळं ठरल्याप्रमाणे नीट पार पडलं.”

क्रिती सेनॉन १० वर्षांनी लहान तरुणाला करतेय डेट? ‘त्या’ फोटोतील कबीरचं साक्षी धोनीशी आहे खास कनेक्शन

मनीषा पुढे म्हणाली, “माझ्या पप्पांच्या डोक्यावर केस नाहीत, त्यांना केस वाढवायचे आहेत, त्यामुळे कृपया केस वाढवण्यासाठी एखादं तेल किंवा काही उपचार असतील, तर कमेंट करून सांगा. तसेच पप्पा लग्नासाठी मुलगी शोधत आहेत, सॉरी मुलगी नाही महिला शोधत आहेत. आम्ही माझ्या वडिलांसाठी जोडीदार शोधत आहोत, त्यामुळे जर कोणाला माझे वडील आवडत असेल तर कृपया व्हिडीओखाली कमेंट करा आणि आम्हाला कळवा.” यावेळी मनीषा व तिचे वडील चुकून त्यांचा खरा फोन नंबर देतात, पण त्याच दरम्यान मनीषा ही गोष्ट लक्षात येते आणि मग ती त्यांना व्लॉगमध्ये पूर्ण नंबर सांगण्यापासून थांबवते.

मराठी बिग बॉस जिंकल्यावर २५ लाखांपैकी निम्मेही पैसे मिळाले नाहीत, शिव ठाकरेचा मोठा खुलासा; म्हणाला, “आई-बाबांच्या तिकिटाचे…”

यापूर्वी ‘झलक दिखला जा ११’ मध्ये, मनीषाने खुलासा केला होता की तिच्या पालकांचा घटस्फोट झाला आहे, पण ती अजूनही तिच्या आईला भेटते. याबाबत तिच्या वडिलांना माहिती नाही. आई लहानपणीच सोडून गेली होती, त्यामुळे तिन्ही भावंडांची सर्व जबाबदारी वडिलांनी उचलली आणि त्यांच्यामुळेच आज ती इथपर्यंत पोहोचू शकली, असं मनीषाने सांगितलं होतं.