Moving in with Malaika: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या तिच्या ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये मलायकाने आतापर्यंत बरेच खुलासे केले आहेत. आतापर्यंत मलायका अरोरा तिच्या डान्स, फिटनेस आणि फॅशन सेन्समुळे चर्चेत राहिली होती. पण तिच्या नव्या आवतारामुळे सर्वच अवाक झाले आहेत कारण या शोमध्ये मलायका अरोरा स्टँडअप कॉमेडीही करताना दिसत आहे. सोशल मीडियावर मलायकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात ती बिनधास्तपणे तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा म्हणते, “मॉडर्न जगातही घटस्फोट हा शब्द लोकांसाठी खूप मोठा आहे. महिलांनी कितीही प्रगती केली तरीही त्या घटस्फोटित असल्या तर लोक सर्वकाही विसरून त्यांच्याबद्दल विशिष्ट मत तयार करून त्यांना बोलू लागतात. माझ्याबाबतीत हे अनेकदा झालं आहे. मी बिझनेस करते, एक आई आहे, मुलगी आहे. पण संपूर्ण जगासाठी मी फक्त घटस्फोटिता आहे.”

आणखी वाचा- “तो मर्द आहे…” अर्जुन कपूरवरुन ट्रोल करणाऱ्यांना मलायका अरोराने सुनावलं

मलायका पुढे म्हणाली, “माझ्या घराच्या समोर आता ‘घटस्फोटिता’ अशी पाटी असायला हवी. मी माझ्या आयुष्यात पुढे गेले आहे. माझा पूर्वाश्रमीचा पती त्याच्या आयुष्यात पुढे गेला आहे, पण मग हे लोक कधी पुढे जाणार आहेत.” हसत हसत मलायकाने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. याशिवाय तिने अर्जुन आणि तिच्या नात्यावरही भाष्य केलं. दोघांच्या वयातील फरकामुळे त्यांना अनेकदा ट्रोल केलं जातं ज्यावर मलायकाने मजेदार अंदाजात उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा- “मला संवाद बोलताना…” चित्रपटात अभिनय न करण्याबद्दल मलायकाने केले स्पष्ट वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मलायका म्हणाली “माझं वय जास्त आहे, हे माझं दुर्भाग्य आहे. माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तीला मी डेट करत आहे. म्हणजेच माझ्यात हिंमत आहे. पण तुम्हाला असं मला म्हणायचं आहे की, मी त्याच्या आयुष्याची वाट लावत आहे, हो ना?” पुढे ती उपहासात्मक पद्धतीने ट्रोलर्सला उत्तर देत म्हणाली, “तो शाळेत जात होता किंवा माझ्याबरोबर रिलेशनशिपमध्ये आल्यामुळे त्याचं अभ्यासात लक्ष लागलं नाही, असं आहे का? मी त्याला माझ्याबरोबर चल असं म्हणाले नाही. आम्ही डेटवर जातो, तेव्हा तो त्याचे क्लास बंक करतो, असंही नाही. पोकेमॉन गेम खेळत असताना तो मला रस्त्यावर भेटलेला नाही आहे. तो एक समज असलेल्या व्यक्ती आहे. मर्द आहे तो”. मलायकाच्या या भागाची चर्चा रंगत आहे.