बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ या शोमुळे चर्चेत आहे. या वेब शोचा चौथा भाग नुकताच प्रदर्शित झाला आहे. या शोमध्ये मलायकाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. मलायका सध्या बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरसह रिलेशनशिपमध्ये आहे.

मलायका वयाने लहान असलेल्या अर्जुनबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याने अनेकदा तिला ट्रोल करण्यात आलं होतं. या शोच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागातून मलायकाने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. या भागात मलायका स्टॅण्ड अप कॉमेडी करताना दिसली. स्टॅण्ड अप कॉमेडीतून तिने अर्जुन कपूरबरोबरच्या रिलेशनशिपबाबत भाष्य करत ट्रोलर्सला खडे बोल सुनावले आहेत.

हेही वाचा >> सलमान खान रिलेशनशिपमध्ये? ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीबरोबर डेटिंगच्या चर्चांना उधाण

हेही वाचा >>आधी कॉफी डेट अन् आता थेट लॉंग ड्राइव्ह; अक्षया-हार्दिकच्या रोड ट्रिपचा फोटो व्हायरल

मलायका म्हणाली “माझं वय जास्त आहे, हे माझं दुर्भाग्य आहे. माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तीला मी डेट करत आहे. म्हणजेच माझ्यात हिंमत आहे, असं मला म्हणायचं आहे. मी त्याच्या आयुष्याची वाट लावत आहे, हो ना?”.

हेही वाचा >>…अन् तेजस्विनी लोणारीच्या घरी पोहोचली ‘बिग बॉस’ची ट्रॉफी; फोटो शेअर करत अभिनेत्रीची भावूक पोस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ती उपहासात्मक पद्धतीने ट्रोलर्सला उत्तर देत म्हणाली, “तो शाळेत जात होता किंवा माझ्याबरोबर रिलेशनशिपमध्ये आल्यामुळे त्याचं अभ्यासात लक्ष लागलं नाही, असं आहे का? मी त्याला माझ्याबरोबर चल असं म्हणाले नाही. आम्ही डेटवर जातो, तेव्हा तो त्याचे क्लास बंक करतो, असंही नाही. पोकेमॉन गेम खेळत असताना तो मला रस्त्यावर भेटलेला नाही आहे. तो एक समज असलेल्या व्यक्ती आहे. मर्द आहे तो”. मलायकाच्या या भागाची चर्चा रंगत आहे.