‘दिल्ली क्राईम’ या सिरीजला जगभरातून प्रचंड लोकप्रियता मिळाली. या सीझनच्या यशानंतर या सिरिजचा दुसरा सीझन गेल्या वर्षी २६ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. तर आता नेटफ्लिक्सने ‘दिल्ली क्राईम’च्या चाहत्यांना नुकतंच एक खास सरप्राईज दिलं आहे. हे सरप्राईज म्हणजे या सिरिजचा तिसरा सीझन प्रदर्शित होणार आहे.

‘दिल्ली क्राईम’च्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. ‘दिल्ली क्राइम’चा पहिला सीझन दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणावर आधारित होता आणि प्रेक्षकांना तो खूप आवडला होता. तर ‘दिल्ली क्राईम सीझन २’चं कथानक दिल्लीतील वृद्धांना सतत टार्गेट करणाऱ्या ‘चड्डी बनियन’ टोळीबद्दल आहे. या टोळीला बाबरिया टोळी असेही संबोधले जाते. ही टोळी रात्रीच्या वेळी घरात घुसून धारदार शस्त्राने लोकांची निर्घृण हत्या करत असत. या दुसऱ्या सीझनलाही प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.

आणखी वाचा : “परिधान करण्यासाठी माझ्याजवळ कपडेही नव्हते…” प्रेमात आकंठ बुडालेल्या शर्मिला टागोर यांनी केली होती ‘ही’ गोष्ट, खुलासा चर्चेत

तर आता नुकताच एक टीझर पोस्ट करत नेटफ्लिक्सने या सिरिजचा तिसरा भाग येत असल्याची घोषणा केली. नेटफ्लिक्सने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नेटफ्लिक्सवरील अनेक गाजलेल्या सिरिजची एकेक झलक दिसत आहे. तर त्याचबरोबर त्यावर प्रेक्षकांनी दिलेले प्रतिसादही दिसत आहेत. यातच शेफाली शाहचा दिल्ली क्राईम सिरिजमधील एक झलकही दिसत आहे. या व्हिडीओच्या शेवटी या सिरिजचा पुढील सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल असं सांगण्यात आलं.

हेही वाचा : ‘दिल्ली क्राइम 2’चा इंटरनेटवर धुमाकूळ, प्रेक्षकांचा मिळतोय तुफान प्रतिसाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्ली क्राईमचा तिसरा सीझन प्रदर्शित होणार असल्याची जरी घोषणा झाली असली तरी तो सीझन कधी प्रदर्शित होणार आणि त्याची काय कथा असणार हे अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.