‘पंचायत ३’ या वेब सीरिजची सध्या खूप चर्चा आहे. लोकांना आधीच्या दोन सीझनप्रमाणेच तिसरा सीझनही प्रेक्षकांना खूप आवडला. या शोमध्ये ‘प्रल्हादचा’ ही भूमिका अभिनेता फैसल मलिकने केली आहे. आपल्या दमदार भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या फैसलने आजवर इतर अनेक वेब शो व मालिकांमध्ये काम केलं आहे. अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’मध्ये त्याने छोटी भूमिका केली. आता त्याचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात अमिताभ बच्चन यांच्याशी खरं बोलल्यावर त्याला नोकरी गमवावी लागली, असं तो म्हणतोय.

‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत फैसलने सांगितलं की तो एकदा एका शोसाठी अनुराग कश्यपबरोबर बिग बींना भेटायला गेला होता. “मी खूप उत्साही होतो कारण मी बच्चन साहेबांना भेटणार होतो. मी त्यांना पाहिल्याबरोबर कामाचं नंतर बोलू, असा विचार करून त्यांना सर्वात आधी ऑटोग्राफ मागितला,” असं फैसल म्हणाला.

‘पंचायत ३’ नंतर या आठवड्यात OTT वर येणार जबरदस्त चित्रपट अन् वेब सीरिज, वाचा पूर्ण यादी

अमिताभ बच्चन यांच्या घरी झालेल्या आदरातिथ्याचं फैसलने कौतुक केलं. “बिग बींच्या घरी आमच्यासाठी सारखं काही ना काही खायला येत होतं. आधीचं संपवण्यापूर्वी नवीन पदार्थांची प्लेट यायची. मी त्यांना सांगितलं की मी अलाहाबादचा आहे आणि मग ते माझ्याशी बोलू लागले. मग त्यांनी मला विचारलं की तिळाचे लाडू खाणार का? मला वाटलं की त्यांच्या वयामुळे ते खाऊ शकणार नाहीत. माफ करा, मी हे बोलायला नको, पण लाडू आल्यावर त्यांनी माझ्या आधी दोन लाडू खाल्ले. मला वाटलं की ते त्यांच्या वयाबद्दल खोटं बोलत आहेत, ते अजूनही खूप तरुण आहेत,” अशी आठवण फैसलने सांगितली.

“ती उत्तम अभिनेत्री आहे, पण…”; कंगना राणौतला ‘पंचायत’च्या प्रल्हादचा यांचा टोला, म्हणाले, “तिची बहीण रंगोली मला…”

स्क्रिप्ट वाचन सुरू असताना स्क्रिप्ट वाचून दाखवणारी व्यक्ती ओव्हर कॉन्फिडंट होती. पण अमिताभ यांनी ६२ क्रमांकाच्या पानावर एक चूक लक्षात आणून दिली. “त्यांना स्क्रिप्टची सर्व १२० पानं आठवत होती आणि ती चूक लक्षात आणून देण्यासाठी त्यांना स्क्रिप्ट पाहण्याचीही गरज भासली नव्हती,” असं फैसल म्हणाला.

स्मिता पाटील यांच्या कांजीवरम साड्यांपासून बनवलेला ड्रेस घालून लेक प्रतीक पोहोचला Cannes मध्ये, पाहा खास Photos

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर नोकरी कशी गमावली याबद्दल फैसलने सांगितलं. “बिग बींनी मला विचारलं, ‘आपण हे कधी शूट करावं असं तुला वाटतं?’ मी प्रामाणिकपणे उत्तर दिलं, ‘सर, आपण आता हे शूट करायला नको, आपण हे सहा महिन्यांनी शूट करायला पाहिजे.’ आम्ही मीटिंग संपवून खाली उतरल्यावर मला सांगण्यात आलं की ‘तू या प्रोजेक्टवर काम करू नकोस, तू सोडून दे’. यामागचं कारण फक्त इतकंच होतं की मी खरं बोललो,” असं फैसल म्हणाला.