एसएस राजामौली यांच्या ‘बाहुबली’मुळे दोन स्टार लोकप्रिय झाले. त्यापैकी एक म्हणजे त्यामध्ये भल्लालदेव ही भूमिका साकाराणारा राणा दग्गुबाती हा अभिनेता. दाक्षिणात्य चित्रपटात राणा हा लोकप्रिय असला तरी त्याला देशभरात ‘बाहुबली’मुळेच ओळख मिळाली. त्याआधी त्याने ‘दम मारो दम’सारख्या हिंदी चित्रपटातही काम केलं होतं. पण ‘बाहुबली’मुळे त्याची प्रसिद्धी आणखी वाढली.

राणा दग्गुबाती सध्या पुन्हा चर्चेत आहे. राणा आता ओटीटीविश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. ‘राणा नायडू’ या नव्याकोऱ्या वेबसीरिजमधून तो आपल्यासमोर येत आहे. नुकताच याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सीरिजमध्ये राणा बॉलिवूड सेलिब्रिटीज संकटात अडकल्यावर त्यांना मदत करण्यासाठी पुढे सरसावणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. ही एक अॅक्शन ड्रामा वेबसीरिज आहे.

आणखी वाचा : ‘कांतारा’ फेम रिषभ शेट्टीची सर्वत्र चर्चा; दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिळणार विशेष पुरस्कार

करण अंशुमन यांनी या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. त्यांनी याआधी प्राइम व्हिडिओच्या ‘इनसाइड एज’, ‘मिर्जापुर’ या वेबसीरिजवरही काम केलं आहे. करण आणि सुपर्ण वर्मा यांनी मिळून या वेबसीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार वेंकटेशसुद्धा यामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. यामध्ये ते राणाच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘राणा नायडू’चा ट्रेलर प्रेक्षकांना आवडला आहे. याविषयी राणा म्हणाला, “हा प्रोजेक्ट बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. मी यासाठी खूप उत्सुक आहे, केवळ नेटफ्लिक्सबरोबर प्रथम काम करणं हे निमित्त आहेच पण याबरोबरच मी प्रथमच माझे काका वेंकटेश यांच्याबरोबर काम करणार आहे. या प्रोजेक्टमध्ये काम करणं हा खूप अप्रतिम अनुभव होता. या कलाकारांकडून खूप काही शिकायला मिळालं. प्रेक्षकांनाही ही वेबसीरिज आवडेल याची मला खात्री आहे. ही वेबसीरिज १० मार्चपासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.