Rapper Raftaar Talk About Samay Raina : बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर नुकताच त्याचा ‘द ट्रेटर्स’ हा नवीन शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या शोमध्ये काही बॉलीवूड अभिनेते आणि सोशल मीडियावरील कंटेट क्रिएटर्सनी सहभाग घेतला आहे. या शोची आगळी वेगळी धाटणी आणि अनोख्या द्विस्टमुळे हा शो अधिक मनोरंजक बनत आहे. यात अपूर्वा मुखिजा, उर्फी जावेद, रफ्तार, जास्मीन भसीनसह काही स्पर्धक चर्चेत आहेत; पण तुम्हाला माहिती आहे का की, कॉमेडीयन समय रैनादेखील या शोचा भाग होणार होता?
समय रैनादेखील करण जोहरच्या ‘द ट्रेटर्स’ शोमध्ये सहभागी होणार होता. याबद्दल रॅपर रफ्तारने खुलासा केला आहे. अपूर्वा मुखिजाने तिच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती रफ्तार आणि समय रैनाबरोबर व्हिडीओ कॉलद्वारे गप्पा मारताना दिसत आहे. या तिघांमधील संभाषणादरम्यान रफ्तार अपूर्वाला सांगतो की, समयदेखील ‘द ट्रेटर्स’मध्ये भाग घेणार आहे, पण त्याच्या तारखांच्या समस्यांमुळे तो या शोमध्ये येऊ शकला नाही. यावर अपूर्वा तिला हे आधीच माहीत असल्याचं सांगते.
तसंच या व्हिडीओत समय दोघांना, “तुम्ही काय करत आहात? हे करण्याची काय गरज होती? तुम्हाला दोघांना माहिती असताना तुम्ही ‘द ट्रेटर्स’मध्ये का गेलात?” असंही म्हणतो. तसंच समय या शोमधील दोघांच्या भांडणाबद्दल विचारतो. सध्या सोशल मीडियावर अपूर्वा आणि रफ्तार यांच्यातील भांडणांचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यावरून अपूर्वा असं म्हणते की शोचे एडिट चुकीच्या पद्धतीने केलं जात आहे. तसंच यावरून ती समयला शोच्या एडिटिंगबद्दल टोमणाही मारते.
समय रैना इन्स्टाग्राम पोस्ट
‘द ट्रेटर्स’ शोचे सूत्रसंचालन करण जोहर करतो. विश्वासघात, डावपेच, आणि खऱ्या साथीदारांचा शोध घेणं अशा धाटणीचा हा शो असून शेवटी यापैकी एक स्पर्धक विजेता ठरणार आहे. करण जोहरचा हा शो ‘डी व्हेराडर्स’चा रिमेक आहे. जगभरात लोकप्रिय ठरलेल्या या रिअॅलिटी शोचे हे भारतीय रूपांतर असून बी बी सी स्टुडियोज इंडिया प्रॉडक्शन्सने ऑल ३ मीडिया इंटरनॅशनलच्या सहकार्याने आणि आयडीटीव्हीच्या बाफटा आणि एमी विजेत्या फॉरमॅटवर आधारित हा शो करण्यात आला आहे.
‘द ट्रेटर्स’ जगभरातील ३० हून अधिक देशांत पाहायला मिळतो आणि आता तो आणखी रोमांचक स्वरूपात भारतीय प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १२ जूनपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि दर गुरुवारी या शोचा नवीन भाग अॅमेझोन प्राइमवर प्रदर्शित होतो. यात अपूर्वा मुखिजा, हर्ष गुर्जर, अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर, अभिनेते आशीष विद्यार्थी, जन्नत जुबेर, जस्मिन भसीन, करण कुंद्रा, रॅपर रफ्तार, राज कुंद्रा, सुधांशु पांडे आणि उर्फी जावेद यांसारखे २० स्पर्धक आहेत.