मर्डर मिस्त्री, सस्पेन्स, क्राइम ड्रामा असलेल्या वेब सीरिजची प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतात. अशीच एक नवीन वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘दहाड’ असं या वेब सीरिजचं नाव आहे. अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणाऱ्या या वेब सीरिजचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘दहाड’ वेब सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा महिला पोलीस अधिकारी अंजली भाटी ही भूमिका साकारताना दिसणार आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून सोनाक्षी ओटीटीवर पदार्पण करत आहे. दबंग पोलीस अधिकाऱ्याच्या वेशातील सोनाक्षीची झलक ‘दहाड’ वेब सीरिजच्या टीझरमध्ये पाहायला मिळणार आहे. सोनाक्षीसह या सीरिजमध्ये विजय वर्मा, गुलशन देवैया आणि सोहम शाहही मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. २७ महिलांच्या खुनामागची मिस्ट्री सोनाक्षी या सीरिजमध्ये सोडवताना दिसणार आहे.

हेही वाचा>> मुख्यमंत्र्यांच्या लेकाशी लग्न, वर्षभरातच पतीचं निधन अन्…; किशोर कुमार यांच्याशी दुसऱ्यांदा विवाह करताना सात महिन्यांची गरोदर होती प्रसिद्ध अभिनेत्री

‘दहाड’ वेब सीरिजच्या टीझरमध्ये २७ निष्पाप महिलांचा खून झाल्याचं दाखविण्यात आलं आहे. एका बेपत्ता मुलीचा शोध घेताना २७ महिलांच्या खूनाची माहिती समोर आल्याचं टीझरमध्ये दिसत आहे. परंतु, याबाबत एकही तक्रार नोंदविण्यात आलेली नाही. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारीच्या भूमिकेत असलेली सोनाक्षी सिन्हा करताना दाखविण्यात आलं आहे.

हेही वाचा>> शिव ठाकरे प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट? डेटिंगच्या चर्चांवर खुलासा करत म्हणाली, “तो खूप…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘दहाड’ या वेब सीरिजचे एकूण आठ भाग प्रदर्शित करण्यात येणार आहेत. एका छोट्याशा शहरातील महिला पोलीस अधिकारी अंजली भाटीच्या अवतीभोवती या सीरिजची कथा आहे. सार्वजनिक शौचालयात एकामागून एक होणाऱ्या खुनांचा तपास अंजली भाटी करत असताना सिरीयल किलर मात्र बिनधास्त फिरत असल्याचं तिच्या लक्षात येत. सुरुवातीला आत्महत्या वाटणाऱ्या या घटना सिरीयल किलरच्या शिकार झाल्याचं समजताच अंजली या प्रकरणाचा छडा कसा लावते, हे या सीरिजमधून दाखविण्यात येणार आहे.