ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेब सीरिज पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक सिनेप्रेमी थिएटरबरोबरच ओटीटीवर चित्रपट, वेब सीरिज व शो पाहणं पसंत करतात. कारण ओटीटीवर जगभरातील दमदार कंटेंट उपलब्ध आहे. प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर नुकताच एक नवीन दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सलग ७ दिवसांपासून पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करतोय.

नेटफ्लिक्सवर जगभरातील कंटेंट आहे, पण प्रेक्षक सध्या या दाक्षिणात्य चित्रपटाला सर्वाधिक पसंती देत आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. हा या आठवड्यातील सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट ठरला आहे. हा दाक्षिणात्य चित्रपट नेमका कोणता आहे, ते जाणून घेऊयात.

काय आहे या चित्रपटाचं नाव?

नेटफ्लिक्सवर नेहमीच उत्कृष्ट चित्रपट आणि वेब सीरिजचा खजिना उपलब्ध असतो. प्रेक्षक या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणाऱ्या नव्या कलाकृतींची आतुरतेने वाट पाहत असतात. २३ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या एका साउथ चित्रपटाने सध्या नेटफ्लिक्सच्या ट्रेडिंग चित्रपटांच्या यादीत पहिलं स्थान मिळवलं आहे. हा गँगस्टर ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाचं नाव दे कॉल हिम ओजी (They Call Him OG) आहे.

दे कॉल हिम ओजीमधील कलाकार

They Call Him OG trending on Netflix : तेलुगू सुपरस्टार पवन कल्याणच्या या चित्रपटात इमरान हाश्मी व प्रियांका मोहन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘दे कॉल हिम ओजी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीतने केले आहे. डीव्हीव्ही एंटरटेनमेंट अंतर्गत डीव्हीव्ही दानय्या आणि कल्याण दसारी यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. यात पवन कल्याण आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहेत. तर, प्रियांका मोहन, अर्जुन दास, श्रीया रेड्डी आणि प्रकाश राज हे सहाय्यक भूमिकांमध्ये आहेत.

दे कॉल हिम ओजी या २ तास ३४ मिनिटांच्या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन आहे. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट गेल्या सात दिवसांपासून पहिल्या क्रमांकावर ट्रेंडिंग आहे. प्रेक्षक मोठ्या उत्साहाने हा चित्रपट पाहत आहेत. या चित्रपटात बॉलीवूड अभिनेता इमरान हाशमी यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे.

दे कॉल मी ओजी कलेक्शन

They Call Me OG Collection : दे कॉल मी ओजी कलेक्शन चित्रपटाने दमदार कलेक्शन केलं. या चित्रपटाने जगभरात जवळपास ३०० कोटींचा व्यवसाय केला आहे. आता ओटीटीवरही हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे.