यामी गौतमचा चित्रपट ‘आर्टिकल ३७०’चा अजूनही बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळत आहे. ‘उरी – द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेल्या आदित्य धर यांनी सत्य घटनेवर आधारित ‘आर्टिकल ३७०’ हा आणखी एक चित्रपट तयार केला होता. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याची घटना सर्वसामान्यांना चांगलीच माहीत आहेत. पण हा यासाठी नेमकी काय व कशी तयारी केली होती, ते सर्व या चित्रपटात फार विस्तृतपणे दाखवण्यात आले आहे.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत आहे. आता हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुक्ता निर्माण झाली होती. सुरुवातीपासूनच प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला.

आणखी वाचा : सलमान खान पुन्हा दिसणार चुलबुल पांडेच्या भूमिकेत; अरबाज खानचं ‘दबंग ४’बद्दल मोठं वक्तव्य

बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणारा हा चित्रपट एप्रिल महिन्यात ओटीटीवर येणार असल्याचं सांगितलं जात आहे. १९ एप्रिल २०२४ पासून ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सुहास जांभळे यांनी केले आहे. तर बी६२ स्टुडिओ आणि जिओ स्टुडिओज लोकेश धर, आदित्य धर आणि ज्योती देशपांडे यांनी याची निर्मिती केली आहे.

या चित्रपटात यामी गौतमसह प्रियमणी, अरुण गोविल व किरण करमरकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात यामीने एका एनआयए अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. चित्रपटात ‘३७० कलम’ हटविण्यामागचा संघर्ष, काश्मीरचा इतिहास, आतंकवादाची पार्श्वभूमी, राजकीय हस्तक्षेप यांवर भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटात आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आली होती. आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट बघत आहेत.