पाकिस्तानी टिकटॉकर हरीम शाहचे काही खासगी व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सोशल मीडिया स्टार असलेल्या हरीम शाहचे बेडरुम व बाथरुममधील एमएमएस लीक झाले आहेत. मित्रांनीच खासगी व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप हरीमने केला आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर आता हरीमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.
हरीमने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये संदल खट्टक आणि आयेशा नाझने तिचे न्यूड व्हिडीओ शेअर केल्याचं म्हटलं आहे. “माझे काही व्हिडीओ एडिट करुन व्हायरल करण्यात आले आहेत. आयेशाने माझ्याबरोबर असताना प्रत्येक गोष्टीचे व्हिडीओ बनवायची. मी कुराणवर हात ठेवून सांगते, कुराण डोक्यावर ठेवून सांगते…माझे व्हिडीओ संदल खट्टक व आयेशा नाझनेच लीक केले आहेत. या दोघांव्यतिरिक्त कोणतीही तिसरी व्यक्ती हे करणं शक्यच नाही”, असं हरीम म्हणाली. हरीमने मैत्रीणींवर आणखीनही आरोप केले आहेत. “संदल सौदी अरेबियामध्ये वैशा व्यवसाय करायची. माझे व्हिडीओ लीक केल्यानंतर तिने मुद्दाम स्वत:ला साधीभोळी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे”, असं हरीम म्हणाली आहे.
हेही वाचा>> पाकिस्तानी टिकटॉकर हरीम शाहचे न्यूड व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पतीची प्रतिक्रिया, म्हणाला “मी पत्नीला…”
हेही वाचा>> पाकिस्तानातील प्रसिद्ध टिकटॉकरचा MMS झाला लीक, न्यूड व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया स्टार म्हणते…
संदल व आयेशाने व्हिडीओ व्हायरल करण्यामागचं कारणही हरीमने सांगितले. ती म्हणाली, “एक महिन्यापूर्वी संदल खट्टकचे काही व्हिडीओ लीक झाले होते. तिचे वैशा व्यवसाय करतानाचे काही खासगी व्हिडीओ व्हायरल झाले होते. यातील काही व्हिडीओ माझ्यापर्यंतही आले होते. याबाबत मी तिला विचारलंही होतं. फ्रान्समध्ये असलेल्या तिच्या नवऱ्यापर्यंतही हे व्हिडीओ पोहोचले होते. त्याला हे व्हिडीओ मी पाठवले असं तिला वाटतं आहे. म्हणून तिने माझे व्हिडीओ व्हायरल केले आहेत. पण मी असं काहीही केलेलं नाही. माझ्याकडे तिच्या वैशा व्यवसायाबाबत सगळी माहिती आहे. पण मी अजूनपर्यंत ती कुठेही शेअर केलेली नाही”.
हेही पाहा>>“नाईट ड्रेस छान आहे” अमृता फडणवीसांना नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले “मेकअपला उशीर झाला म्हणून…”
हरीम शाह ही पाकिस्तानमधील प्रसिद्ध टिकटॉकर व सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर आहे. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पाकिस्तानमधील प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारपैकी हरीम शाह एक आहे. तिचा चाहता वर्ग मोठा असून इन्स्टाग्रामवर हरीम शाहचे २ लाख ९६ हजार फॉलोवर्स आहेत. हरीम टिकटॉकवरही लोकप्रिय आहे. तिचे टिकटॉकवर १ लाख ८६ हजार फॉलोवर्स आहेत.