Parikshit Sahni reveals Sanjeev Kumar Died from Excessive Drinking : ‘शोले’, ‘त्रिशूल’ व ‘खिलौना’सारख्या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी ओळखले जाणारे संजीव कुमार हे त्यांच्या पिढीतील सर्वांत प्रशंसित अभिनेत्यांपैकी एक होते. वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि आजही चाहते व मित्र त्यांची आठवण काढतात. ते अनेकदा म्हणतात की, त्यांच्या मद्यपानाच्या सवयींमुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला. अलीकडेच एका मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेते परीक्षित साहनी यांनी संजीव कुमार यांची जीवनशैलीची माहिती दिली. त्यामुळे त्यांचे निधन झाले.
एएनआयशी बोलताना साहनी म्हणाले, “त्यांना वाईट सवयी होत्या. शूटिंगनंतर ते खूप मद्यपान करायचे. पहाटे २ वाजता ते खूप खायचे आणि हाडे टेबलाखाली फेकून द्यायचे. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.”
परीक्षित साहनी पुढे म्हणाले, “ते माझ्या भावासारखे होते. मी नुकताच रशियाहून परतलो होतो आणि त्यांनी मला ‘अनोखी रात’ या चित्रपटात कास्ट केले. त्यावेळी मला हिंदी येत नव्हते. कारण- मी सहा वर्षांपासून रशियन बोलत होतो आणि त्याआधी मला इंग्रजी येत असे. हिंदी डायलॉग्ज खूप कठीण होते.”
परीक्षित साहनी म्हणाले, “म्हणून संजीवभाई माझ्यासाठी मोठ्या भावासारखे बनले आणि ते मला डायलॉग्ज कसे बोलावे हे सांगत असत. माझे सर्व पॉज चुकीचे होते आणि त्यांनी मला कधी पॉज घ्यायचे हे शिकवले. दिग्दर्शक अनेकदा कंटाळून मला पॉज घ्यायला सांगायचे; पण मला कधी थांबायचे ते समजत नव्हते. संजीवभाईंनीच मला मदत केली आणि तेव्हापासून त्यांच्या निधनापर्यंत आम्ही खूप जवळ होतो.”
संजीव कुमार हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वांत प्रतिभावान व हुशार अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांनी अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. दिवंगत अभिनेते संजीव कुमार यांचं खरं नाव हरिहर जेठालाल जरीवाला होतं.