बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने तिच्या खास भूमिकांमुळे चाहत्यांची मोठी पसंती मिळवली आहे. परिणीती सोशल मीडियावरदेखील सक्रिय असून चाहत्यांशी संवाद साधत असते. इन्स्टाग्रामवर परिणीतीचे लाखो चाहते आहेत. नुकताच परिणीतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आस्क मी एनिथिंग या सेशनमधून चाहत्यांशी मनसोक्त संवाद साधला होता. चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना परिणीतीने बिनधास्त उत्तर दिली आहेत.

या सेशनमध्ये अचानकच एका चाहत्याने परिणीतीला तिच्याबद्दल प्रश्न विचारायचं सोडून परिणीताचा सहकलाकार असलेल्या रणवीर सिंहबद्दल प्रश्न विचारला. यावर परिणीतीने देखील चाहत्यांला उत्तर दिलं आहे. एका चाहत्यांने विचारलं “रणवीर सिंह वडील झाला” यावर परिणीती चोप्राने रणवीर सिंहला टॅग करत रणवीरकडूनच कन्फर्म करून घे असं चाहत्यला सांगितलं. त्यामुळे अनेक चाहते आता रणवीर आणि दीपिका पादूकोण गोड बातमी कधी देणार याची वाट पाहत असल्याचं लक्षात येतंय.

हे देखील वाचा: “आता मी शेतकरी आहे”; सफरचंदाच्या बागेतील प्रिती झिंटाचा व्हिडीओ व्हायरल

pareeniti-chopra-ranveer

 

या सेशनमध्ये परिणीतीला अनेक चाहत्यांनी विविध प्रश्न विचारले आहेत. काही दिवसांपूर्वीच परिणीतीने तिच्या लहानपणीचा फोटो शेअर केला होता. या फोटोला तिने कटोरी कट असं नाव दिलं होतं. यानंतर या सेशनमध्ये अनेकांनी परिणीतीचा हेअर कट त्यांना आवडल्याचं म्हंटलं आहे.

त्यासोबतच अनेकांनी परिणीतीच्या नाकाची देखील प्रशंसा केली आहे. हे पाहून परिणीतीलादेखील आश्चर्य वाटलं.
‘सायना’ सिनेमातून परिणीतीने चाहत्यांची पंसती मिळवली होती. त्यासोबतच लवकरच परिणीची रणबीर कपूर आणि अनिल कपूरसोबत ‘अॅनिमल’ या सिनेमात झळकरणार आहे.