महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरे चित्रीत ‘अजिंक्य’ या चित्रपटाचे सोशल मीडिया आणि चित्रपट विश्लेषकांकडून कौतुक होताना दिसत आहे. अमराठी निर्माते अरुणकांत शुक्ला, नीरज आनंद, राघवेंद्र के. बाजपेयी, बाबालाल शेख, राहुल लोंढे, आणि वेद. पी शर्मा यांनी अजिंक्य या चित्रपटात शेतकऱ्यांच्या व्यथा आणि त्यावर तोडगा काढणाऱ्या तरुणाची कथा दाखवण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट संपूर्णपणे भारतीय शेतकऱ्यांना समर्पित करत आहोत असे निर्मात्यांनी म्हटले आहे. शेतकरी चळवळीसाठी समर्पित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरू शकेल.

शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्याच्या सर्वात मोठ्या बाबींवर भाष्य करणाऱ्या अजिंक्यची आणि सध्या देशात या विषयी सुरू असणाऱ्या घडामोडी याच कारणामुळे सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आयएमडीबी (IMDb) वर या चित्रपटाला १० पैकी १० रेटिंग्ज मिळाले आहेत. कालपासून ट्विटरवर देखील मोदी इज अजिंक्य टुडे (#ModiisAjinkyatoday) हा हॅशटॅग ट्रेंड होत असून लोकांमार्फत अजिंक्य या चित्रपटाबद्दल खूप बोललं जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘अजिंक्य’ चित्रपटाचे मुख्य कलाकार म्हणजेच भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरे यांनी देखील चित्रपटाच्या संकल्पनेमुळे काम केले असल्याचे सांगितले. याबद्दल निर्माते नीरज आनंद सांगतात, “चित्रपट हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून यातून जनतेचे प्रबोधन व्हावे आणि याच उद्देशाने भारताच्या विविध ठिकाणाहून आलेले आम्ही एकत्र येऊन एका सिनेमासाठी काम करत आहोत. लावलेल्या पैश्याच्या परतफेडीचा विचार न करता एक ज्वलंत विषय लोकांसमोर आणणे आम्हाला महत्वाचे वाटते. हा चित्रपट देशाला जगवणारे अन्नदाते म्हणजेच आपले शेतकरी बंधू यांना समर्पित करण्याची आमची ईच्छा आहे.”