बॉलिवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानला ओळखले जाते. शाहरुखने आतापर्यंत एकापेक्षा एक चित्रपटात काम केले आहे. नुकतंच शाहरुख खानच्या आगामी पठाण चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात शाहरुख खान हा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाद्वारे शाहरुख खान हा तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनपदार्पण करत आहे.

शाहरुख खानने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्रामवर पठाण चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करताना शाहरुखने त्याला भन्नाट कॅप्शन दिले आहे. “मला माहिती आहे फार… उशीर झाला आहे. पण तारीख लक्षात ठेवा. वेळ सुरु झाली आहे. येत्या २५ जानेवारी २०२३ रोजी चित्रपटगृहात भेटू”, असे शाहरुख खानने म्हटले आहे.

Amitabh Bachchan look in Kalki 2898 AD
‘शेवटच्या युद्धाची वेळ आली आहे!’ Kalki 2898 AD चा टीझर प्रदर्शित; ‘अश्वत्थामा’च्या दमदार भूमिकेत आहेत अमिताभ बच्चन
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Love Sex Aur Dhokha 2 to feature trans woman Bonita Rajpurohit
एकेकाळी १० हजार रुपये महिन्याने करायची काम, आता ट्रान्सवूमन बोनिता एकता कपूरच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

या ट्रेलरची सुरुवात जॉन अब्राहम आणि दीपिका यांच्या एंट्रीने होते. त्यावेळी ते जॉन आणि दीपिका ‘पठाण’ची ओळख करून देतात. यावेळी ते म्हणतात की याचे काहीही नाव नाही. पण त्याच्या जीवनाचे आपल्या देशाचे रक्षण करणे हे एकच ध्येय आहे. यावेळी शाहरुख हा पांढऱ्या शर्टमध्ये आणि लांब केस अशा अवतारात दिसत आहे. यावेळी तो देशावरील प्रेमाबद्दल बोलत आहे.

यश राज फिल्मला लवकरच ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. हा आनंद साजरा करणासाठी यश राज फिल्म्स ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शित करणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान हा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. पठाण या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमही दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख आणि जॉन ही जोडी पहिल्यांदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Gangubai Kathiawadi : दीपिका पदुकोण-प्रियांका चोप्रालाही झाली होती मुख्य भूमिकेसाठी विचारणा, पण…

शाहरुख खानचा पठाण चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषेत प्रदर्शित होणार आहे. येत्या २५ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.