scorecardresearch

पत्रलेखाकडून लग्नाच्या ओढणीवर राजकुमारसाठी खास संदेश, जाणून घ्या काय आहे नेमका अर्थ?

तिने राजकुमारसाठी एक खास संदेश लिहिला होता.

पत्रलेखाकडून लग्नाच्या ओढणीवर राजकुमारसाठी खास संदेश, जाणून घ्या काय आहे नेमका अर्थ?

अभिनेता राजकुमार रावने अखेर गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत लगीनगाठ बांधली. या दोघांनी सोमवारी १५ नोव्हेंबरला लगीनगाठ बांधली. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी चंदीगडमधील ओबेरॉय सुखविलास स्पा रिसॉर्टमध्ये लग्नाच्या सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या सर्व फोटोत पत्रलेखाच्या लेहंगा आणि ओढणीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तिच्या या ओढणीवर राजकुमारसाठी एक खास संदेश देण्यात आला होता.

राजकुमार राव आणि पत्रलेखा या दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे काही खास फोटो शेअर केले आहेत. यात पत्रलेखाने लग्नात सप्तपदी घेतेवेळी खास लेहंगा परिधान केला होता. तिच्या या लेहंग्यासोबत तिने परिधान केलेल्या ओढणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावर तिने राजकुमारसाठी एक खास संदेश लिहिला होता.

पत्रलेखाने परिधान केलेल्या या ओढणीवर बंगाली भाषेत काही खास ओळी लिहिण्यात आल्या होत्या. या ओळी प्रेमासंबंधित आहेत. ‘अमर पोरन भौरा भालोबाशा अमी तोमर शो मोर पोन कोरिलम,’ अशा ओळी तिच्या ओढणीवर लिहिण्यात आल्या आहेत. ‘मी माझे प्रेमळ हृदय तुझ्याकडे सोपवते,’ असा या शब्दांचा अर्थ होतो.

राजकुमार राव आणि पत्रलेखा ‘या’ अलिशान रिसॉर्टमध्ये घेणार सप्तपदी, एका रात्रीचे भाडे माहितीये का?

“आज मला तुझा पती…”; राजकुमार रावची लगीनघाई, गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत घेतली सप्तपदी

दरम्यान राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा साखरपुडा १३ नोव्हेंबरला पार पडला. यानंतर १४ नोव्हेंबरला मेहंदी आणि संगीत या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्हीही कार्यक्रमांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजकुमार राव यांच्या साखरपुड्याच्या दिवशी पांढऱ्या रंगाची थीम ठेवण्यात आली होती. यावेळी त्याने गुडघ्यावर बसून पत्रलेखाला प्रपोज केले आणि अंगठी घातली. तर काल १५ नोव्हेंबरला ते दोघेही विवाहबंधनात अडकले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-11-2021 at 10:02 IST

संबंधित बातम्या