मराठीमध्ये सध्या ऐतिहासिक चित्रपट येत आहेत. याच ऐतिहासिक चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘पावनखिंड. या चित्रपटामध्ये अभिनेते अजय पुरकर यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका उत्तमरित्या साकारली. अजय यांना इतिहासाचं प्रचंड वेड आहे. म्हणूनच की काय त्यांनी ज्या भूमीत पावनखिंडची लढाई झाली त्याच भूमीत आपलं घर बांधलं. आता त्यांनी या नवीन घरात गृहप्रवेश देखील केला आहे. एक खास पोस्ट शेअर करत अजय यांनी याबाबत माहिती दिली.

आणखी वाचा – Photos : विशाळगडाच्या पायथ्याशी ‘पावनखिंड’मधील अभिनेत्याने बांधलं घर, पाहा फोटो

काही दिवसांपूर्वीच अजय यांच्या विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता अजय यांनी नव्या घरात प्रवेश केला आहे. त्यांनी आपल्या नवीन घराच्या दारात उभं राहून फोटो काढला. हा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत म्हटलं की, “१९ जूनला नवीन घरामध्ये गृहप्रवेश. त्याच दिवशी ‘पावनखिंड’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर. योग जुळून आलाय. उत्तम मुहूर्तावर दोन्ही गोष्टी घडल्या. महादेवाचा आर्शिवाद.”

हे घर म्हणजे अजय यांच्यासाठी स्वप्न होतं. त्यांनी ऐतिहासिक भूमिका रुपेरी पडद्यावर साकारली. पण प्रत्यक्षात ते ही भूमिका जगले. शिवाय त्यांचं इतिहासावर प्रचंड प्रेम आहे. हे वारंवार लक्षात येतंच. ज्या मातीत इतिहास घडला, बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या जीवाची बाजी लावली त्याच मातीत आपलं एखादं घर असावं असं अजय यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न आता खऱ्या अर्थाने सत्यात उतरलं आहे.

आणखी वाचा – ‘सम्राट पृथ्वीराज’नंतर ‘रक्षाबंधन’ही फ्लॉप होणार?, नव्या लूकमुळे अक्षय कुमार ट्रोल, नेटकरी म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या शौर्य, धैर्य आणि पराक्रमाची यशोगाथा ‘पावनखिंड’मध्ये दाखवण्यात आली. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. अजय यांची या चित्रपटामधील भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहणारी आहे.