आपल्या बिनधास्त स्वभावामुळे अभिनेत्री पायल रोहतगी नेहमीच चर्चेत असते. अलिकडेच ती कंगना रणौतच्या ‘लॉक अप’ रिअलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. पायल या शोची उपविजेती ठरली. तर मुनव्वर फारूखी या शोचा विजेता ठरला होता. शो संपल्यानंतर पायलनं दावा केला होता की, कंगनानं मुनव्वरला पाठिंबा दिल्यामुळेच तो शोचा विजेता होऊ शकला. यासोबतच तिने कंगनावर टीका देखील केली होती.

काही दिवसांपूर्वीच कंगनाचा ‘धाकड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण बॉक्स ऑफिसवर मात्र या चित्रपटाला फारशी चांगली कमाई करता आली नाही. आता याच मुद्द्यावरून पायलनं पुन्हा एकदा कंगनावर निशाणा साधला असून तिनं इन्स्टाग्राम पोस्टमध्ये कंगनाची खिल्ली उडवली आहे.

आपल्या पोस्टमध्ये तिने लिहिलं, “दुःखद, ही सगळी कर्मांची फळं आहेत. ज्याला १८ लाख वोट मिळाले. ना त्याने चित्रपटाचं प्रमोशन केलं ना त्याचे नकली वोटर्स चित्रपट पाहण्यासाठी आले. सीता मातेवर चित्रपट निर्मिती करणार आहे आणि त्यात सीता मातेची खिल्ली उडवणाऱ्याला कादाचित चित्रपटात भूमिका देखील मिळेल. कारण त्याला आपली ऑब्जेक्टिव्हिटी दाखवायची आहे.”

आणखी वाचा- भाषा वाद : PM मोदींच्या प्रतिक्रियेनंतर किच्चा सुदीप म्हणतो; “भांडण व्हावं असं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान पायल रोहतगी या आधी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, “मी कंगनाची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘धाकड’च्या प्रीमियरला एवढ्याच कारणासाठी गेले होते की, त्याची निर्मिती सोहेल मकलईनी केली आहे आणि तो माझा होणारा पती संग्राम सिंहचा मित्र आहे.”