काही महिन्यांपूर्वी ‘पोन्नियिन सेल्वन: १’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मणिरत्नम दिग्दर्शित या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांना भारावून टाकलं. त्यानंतर या चित्रपटाच्या पुढील भागाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर या चित्रपटाचा दुसरा भाग 28 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनानंतर दोन दिवसांतच या चित्रपटाने जगभरातून मोठा गल्ला जमवला.

‘कोइमोई’च्या वृत्तानुसार, ‘PS-2’ ने प्रदर्शनापूर्वी ७.६ कोटी रुपयांची अॅडव्हान्स तिकिटं विकली होती. तर, पहिल्या भागाची अॅडव्हान्स बूकिंग १६ कोटी रुपयांची झाली होती. आता पहिल्या दिवशी ‘PS-2’ने सर्व भाषांमध्ये देशभरात ३२ कोटी रुपये कमावले होते. तर भारताबरोबरच भारताबाहेरही या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने दोन दिवसांत किती कमाई केली हा आकडा आता समोर आला आहे.

Surya's revelations about Bumrah
MI vs RCB : जसप्रीत बुमराहला नेट्समध्ये खेळायला घाबरतो सूर्यकुमार यादव, स्वत:च केला खुलासा; म्हणाला तो…
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?

आणखी वाचा : “आताची वेळ चांगली, कारण…”, ऐश्वर्या रायने बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपट वादावर दिली प्रतिक्रिया

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांतच ‘पोन्नियिन सेल्वन: २’ने जगभरातून शंभरहून अधिक कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने भारतातून २८.५ कोटींची कमाई केली तर जगभरातून दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ५२ कोटी कमावले.

हेही वाचा : काय सांगता! ‘पुष्पा २’साठी अल्लू अर्जुनने आकारले ‘इतके’ कोटी, मानधनाचा आकडा वाचून व्हाल आवाक्

‘पोन्नियिन सेल्वन: २’ मध्ये विक्रम, जयम रवी, कार्ती, ऐश्वर्या राय, त्रिशा, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलिपाला आणि इतर कलाकार आहेत. हा चित्रपट भारतात तामिळ, हिंदी, तेलगू, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.