दिग्दर्शक मणिरत्नम यांचा ‘पोन्नियिन सेल्वन: २’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी जगभरात प्रदर्शित झाला. साऊथच्या सुपरहिट चित्रपटांच्या यादीत ऐश्वर्या रायचा ‘पोन्नियिन सेल्वन-२’ देखील सामील झाला आहे. या चित्रपटाने कमाईत आतापर्यंत जगभरात ३०० कोटींचा आकडा पार केला आहे. आता OTT चे चाहते नंदिनीला PS-2 मध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मणिरत्नम यांचा हा ऐतिहासिक चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटाचा पहिला भाग PS-1 आधीच OTT वर उपलब्ध आहे.
हेही वाचा- Video: सुश्मिता सेनचं एक्स बॉयफ्रेंडशी पॅचअप? दोघांचाही ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
आता पोन्नियिन सेल्वन-2 लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २८ जून रोजी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime वर प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निर्मात्यांना ओटीटी रिलीजसाठी मोठी रक्कम देण्यात आली आहे. PS-1 आधीपासून Amazon Prime वर हिंदीमध्ये उपलब्ध आहे.
हेही वाचा- सलमानला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्याविरोधात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ‘लूक आऊट’ नोटीस जारी
‘पोन्नियिन सेल्वन: २’ हा कल्की कृष्णमूर्ती यांनी लिहिलेल्या याच नावाच्या लोकप्रिय साहित्यिक कादंबरीवरून रूपांतरित केलेला पीरियड ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींहून अधिक कमाई केली होती. या चित्रपटात चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, कार्ती, त्रिशा आणि जयम रवी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलिपाला, जयराम, प्रकाश राज, विक्रम प्रभू, सरथकुमार, पार्थिवन आणि प्रभू साहाय्यक भूमिकेत आहेत.