अभिनेता प्रभासचा आगामी चित्रपट ‘आदिपुरुष’ सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाची जिथपासून घोषणा करण्यात आली अगदी तिथपासूनच चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरील प्रभासचा लूक विशेष लक्षवेधी ठरत आहे. या चित्रपटामध्ये तो भगवान राम यांची भूमिका साकारताना दिसेल. त्याचबरोबरीने कौतुकाची गोष्ट म्हणजे मराठमोळ्या कलाकारांचं या चित्रपटाशी नाव जोडलं गेलं आहे.

आणखी वाचा – “ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का?” ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा बोल्ड प्रोमो पाहून नेटकरी संतापले

हातात धनुष्यबाण घेतलेला प्रभासचा या पोस्टरवरील लूक सध्या चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये सैफ अली खान, क्रिती सेनॉन यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. तसेच आता या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या मराठमोळ्या कलाकारांची नावं देखील समोर आली आहेत. मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित तसेच अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटामध्ये काम करताना दिसतील.

तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत आमचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असल्याचं म्हटलं आहे. तिची पोस्ट पाहता सेलिब्रिटी मंडळींनी तिला या चित्रपटासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच देवदत्तनेदेखील चित्रपटाचे पोस्टर शेअर करत आपण या चित्रपटामध्ये काम करत असल्याची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे.

आणखी वाचा – Bhediya Teaser : वरुण धवनच्या ‘भेडिया’चा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेजस्विनी व देवदत्त या दोघांचंही सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक होत आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम व कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होईल. करोनाकाळामध्ये ओम राऊतने या चित्रपटावर काम केलं. पुढील वर्षी १२ जानेवारीला चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.