Prahlad Kakkar On Sushmita Sen And Govinda : गोविंदा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने त्याच्या हटके स्टाईलनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेता त्याच्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. चित्रपट निर्माते प्रल्हाद कक्कर यांना अलीकडेच बॉलीवूड अभिनेता गोविंदाबरोबर काम करण्याचा त्यांचा अनुभव आठवला.
एएनआयशी बोलताना कक्कर म्हणाले, “गोविंदात २४ तास उशिरा येण्याची आणि वेळेवर येण्याचे नाटक करण्याची क्षमता होती.” सेटवरील एका खास घटनेची आठवण करून देताना कक्कर म्हणाले, “एकदा तो दुःखाने म्हणाला, ‘मी आलो आहे, चला तयारी करूया.’ त्यावर मी म्हणालो, ‘पण बॉस, तुम्ही उद्या येणार होते; पण तुम्ही आज आलात.’ त्यावर तो म्हणाला, ‘एका दिवसानं काय फरक पडतो?’
त्याच मुलाखतीत, प्रल्हाद कक्कर यांनी १९९४ च्या मिस इंडिया स्पर्धेतल्या मनोरंजक गोष्टी सांगितल्या. सुश्मिता सेन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यात ही एक तीव्र स्पर्धा होती. संभाषणादरम्यान, कक्कर यांनी एका घटनेची आठवण करून दिली, जिथे त्यांना सुश्मिता सेन स्पर्धेदरम्यान चेंजिंग रूमच्या एका कोपऱ्यात रडताना दिसली होती. कक्कर म्हणाले, “एके दिवशी सुश्मिता चेंजिंग रूमच्या एका कोपऱ्यात खूप रडत होती. मी तिच्याकडे गेलो आणि तिला विचारलें की, ती कशी आहे. ती म्हणाली, ‘नाही, सर्व काही ठीक आहे.”
आपल्या अभिनय आणि हटके डान्सने गोविंदाने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. मात्र, नंतरच्या काळात त्याचे चित्रपट अपयशी ठरले आणि त्याचे स्टारडम कमी होऊ लागले. त्याचदरम्यान, गोविंदाच्या वेळ न पाळण्याबाबतचे अनेक किस्सेदेखील गाजू लागले. गेल्या काही वर्षांपासून तो अभिनय क्षेत्रापासून दूर आहे.
बॉलीवूड अभिनेता गोविंदाच्या पत्नी सुनीता आहुजा अनेकदा कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी ही जोडी घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सुरू होत्या; मात्र दोघांनी एकत्र हजेरी लावत या चर्चा खोट्या ठरवल्या.