अभिनेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. नुकताच त्याने आईला श्रद्धांजली वाहिली आहे. प्रतिकने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने आईच्या नावाचा टॅट्यू काढला असल्याचे दिसत आहे.
प्रतिकने मंगळवारी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये त्याने छातीवर आईचे नाव लिहिले असून बाजूला स्टार काढला आहे. हा फोटो शेअर करत प्रतिकने ‘मी माझ्या हृदयावर आईचे नाव कोरले आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
आणखी वाचा : ‘म्हणून सैफ आणि करीनाच्या लग्नासाठी उत्सुक नव्हते’, शर्मिला टागोर यांनी केला खुलासा
स्मिता पाटील यांनी हिंदी, गुजराती, मराठी, मल्याळम आणि कन्नड या भाषांमधील चित्रपटात काम केले आहे. त्यांनी ८० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले. त्या वेळी स्मिता पाटील या अतिशय लोकप्रिय अभिनेत्री होत्या. १३ डिसेंबर १९८६ रोजी त्यांचे निधन झाले.
प्रतिकचा काही दिवसांपूर्वी ‘मुंबई सागा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहम, इम्रान हाश्मी, काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत होते. तसेच तो ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. प्रतिकने काही वेब सीरिजमध्ये देखील काम केले आहे.