हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळविणारे हंबीरराव मोहिते यांची ख्याती अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यांचा हाच जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर उलगडला जाणार आहे. चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता प्रविण विठ्ठल तरडे हे हंबीरराव मोहिते यांच्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. नुकतंच त्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. नुकतंच प्रविण तरडे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

प्रविण तरडेंनी ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचे एक नवे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये प्रविण तरडे एका वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे. परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट, असे या पोस्टरवर लिहिले आहे. प्रविण तरडेंनी त्याला हटके कॅप्शन दिले आहे.

“आता आपण फक्त दिवस मोजायचे.. ७५ राहिले!” असे म्हणतं प्रवीण तरडेंनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरसेनापती हंबीरराव हा २७ मे २०२२ ला प्रदर्शित होणार आहे. यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

“श्रेया बुगडे आम्हाला अशी उघड्यावर पाडेल असं वाटलं नव्हतं…”, कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टची सर्वत्र चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रविण विठ्ठल तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ या संवेदनशील, सामाजिक चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकत बॉक्सऑफिसवर दणदणीत यश संपादन केले. यामुळे प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढचा चित्रपट कोणता? याबद्दल रसिकांच्या मानत उत्सुकता होती. तरडे यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केल्यापासून महाराष्ट्रासह जगभरातील चाहते या ऐतिहासिक चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.