लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. प्रवीण तरडे यांचा बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ आणि धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे हे दोन्हीही चित्रपट सुपरहिट ठरले. रोखठोक संवाद आणि जबरदस्त अ‍ॅक्शनमुळे यामुळे या दोन्हीही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले होते. या चित्रपटांसाठी प्रवीण तरडे यांना यंदाच्या शाहीर दादा कोंडके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुकतंच त्यांनी याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

प्रवीण तरडे यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. त्यांनी शेअर केलेला हा फोटो शाहीर दादा कोंडके पुरस्कार २०२२ ने सन्मान केल्यादरम्यानचा आहे. प्रवीण तरडे यांना सर्वोत्त्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सन्मानित करण्यात आले.

प्रसाद ओकने दिल्या महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा, ‘धर्मवीर’मधील खास फोटो शेअर करत म्हणाला…

“शाहीर दादा कोंडके पुरस्कार २०२२ – सर्वोत्त्कृष्ट दिग्दर्शक. यंदाचा हा मानाचा पुरस्कार सरसेनापती हंबीरराव आणि धर्मवीर , मुक्काम पोष्ट ठाणे या दोन्ही सिनेमांच्या दिग्दर्शनासाठी मिळाला. या दोन्ही सिनेमांसाठी अहोरात्र झटलेल्या प्रत्येकाला हा पुरस्कार समर्पित”, असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिले आहे.

“सरसेनापती हंबीरराव हा दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांच्या तुलनेत…”, प्रवीण तरडे यांचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

दरम्यान प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन महान छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळाली. या चित्रपटात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वत: प्रवीण तरडे यांनी साकारली होती.

Sarsenapati Hambirrao Box Office Collection : ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, तीन दिवसात कमावले इतके कोटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे या चित्रपटाच्यानिमित्ताने रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आला. या दोन्हीही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.