ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आणि बॉलीवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा या चित्रपटसृष्टीतील सर्वात आवडत्या अभिनेत्रींपैकी दोघी आहेत. गेल्या काही वर्षांत दोघींनी अनेक वेळा एकमेकांचे कौतुक केले आहे.
प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रेखा यांच्या एका पेंटिंगचे पोस्टर रिपोस्ट केले आहे. फोटोमध्ये रेखा खूपच सुंदर दिसत आहेत. पोस्टरवर लिहिले होते, ‘बेटर अ बिच देन अ बेचारी.’ ऐश्वर्या राय, अनिल कपूर आणि अक्षय खन्ना यांच्या ‘ताल’ चित्रपटातील ‘ताल से ताल’ गाण्याचे रिमिक्सदेखील पोस्टमध्ये जोडण्यात आले.
लोकांनी केल्या कमेंट्स
रेखा यांच्या पोस्टमध्ये लोकांनी ‘बच्चन’ हे नाव वाचले. ही पोस्ट लाईव्ह होताच काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी म्हटले की ते बच्चन म्हणून वाचत आहेत. काहींनी असेही म्हटले की, ही पोस्ट जाणूनबुजून अशा प्रकारे लिहिली गेली आहे. काही जण बोलले आहेत की, त्यांनी चित्रावर लिहिलेला बोल्ड टेक्स्ट चुकीचा वाचला आहे. एका नेटकऱ्याने टिप्पणी केली- मी बच्चन का वाचले? दुसऱ्याने लिहिले- मी आधी बच्चन वाचले.”
प्रियांका आणि रेखा यांचे प्रेम
प्रियांका आणि रेखा यांनी नेहमीच एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर दाखवला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, जूनमध्ये रेखा यांचा आयकॉनिक चित्रपट ‘उमराव जान’ 4K आवृत्तीमध्ये थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला. प्रियांका त्याच्या प्रीमियरला उपस्थित राहू शकली नाही, तरी तिने तिचे प्रेम रेखाला इन्स्टाग्रामद्वारे पाठवले.

रविवार, २२ जून रोजी तिने तिच्या इन्स्टा स्टोरीवर चित्रपटातील एक व्हिडीओ क्लिप शेअर केली, ज्यामध्ये तिने भावनिक नोट लिहिली होती, ‘माझ्या आवडत्या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी तिथे नसल्याबद्दल दुःख झाले. ही एक उत्तम रात्र असणार आहे, अभिनंदन मॅम.’
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर प्रियांका शेवटची ‘हेड्स ऑफ स्टेट’ चित्रपटात दिसली होती, जिथे तिने इद्रिस एल्बा आणि जॉन सीना यांच्याबरोबर काम केले होते. पुढे, पीसी ‘सिटाडेल’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये परतणार आहे.