प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे मनोरंजनसृष्टीतील सर्वात लोकप्रिय लोकप्रिय जोडपे आहे. सोशल मीडियावर या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ दररोज व्हायरल होताना दिसतात. शेअर होणाऱ्या त्यांच्या फोटो आणि व्हिडीओजमध्ये त्यांचे एकमेकांवरील असलेले प्रेम हे नेहमीच दिसून येते. मात्र निक जोनस शेअर केलेल्या व्हिडीओमुळे सध्या त्याचे चाहते चिंतेत पडले आहेत.

निक जोनस अमेरिकेतील एक प्रसिद्ध गायक आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने आजराची लक्षणं सांगितली आहेत. या लक्षणांमधून असं दिसून येत आहे की त्याला मधुमेह हा आजार जडला आहे. मधुमेहाविषयाची माहिती त्याने व्हिडीओमध्ये सांगितली आहेत.

अक्षय कुमार गुजरात दौऱ्यावर! ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला भेट देत म्हणाला…

सोशल मीडियावर त्याने हा व्हिडीओ टाकल्यावर त्याचे चाहते कॉमेंट करू लागले आहेत. तो लवकर बरा व्हावा यासाठी ते प्रार्थना करत आहेत. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याने चाहत्यांना हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करण्यास सांगितले आहे. प्रियांका सध्या निकसोबत लॉस एंजेलिसमध्ये राहते. नुकताच तिने करावा चौथ हा सण साजरा केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१८ मध्ये तिने प्रियांका निक जोनसशी लग्न केले. त्यांचा विवाह सोहळा भारतीय पद्धतीने करण्यात आला होता. या जोडप्याने सरोगसीच्या मदतीने एका मुलीला जन्म दिला आहे. या मुलीचे नाव त्यांनी ‘मालती मेरी’ असे ठेवले आहे.