बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर १४ एप्रिलला मुंबईमध्ये लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर लगेचच आलियानं आपल्या विवाहसोहळ्याचे विविध फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना याची माहिती दिली. आलियाने शेअर केलेल्या लग्नाच्या या फोटोंवर अनेक बॉलिवूड कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. नुकतंच बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राने या नवविवाहित दाम्पत्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियांका चोप्राची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन एक स्टोरी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने आलिया-रणबीरच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पोस्ट करत तिने त्या दोघांनाही लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “तुम्हा दोघांचेही खूप खूप अभिनंदन. तुमच्या दोघांचे प्रेम आयुष्यभर असेच राहावे”, असे प्रियांकाने लग्नाच्या शुभेच्छा देताना म्हटले आहे.

त्यासोबतच रणबीर कपूरची पूर्वाश्रमीची गर्लफ्रेंड दीपिका पदुकोणनेही त्या दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दीपिकाने आलियाच्या फोटोवर कमेंट करत दोघांना नवीन आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर कतरिना कैफने इन्स्टाग्रामवर या दोघांचा फोटो शेअर करत त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाच्या फोटोंवर स्मृती इराणींची कमेंट चर्चेत, म्हणाल्या…
इतकंच नव्हे तर शाहिद कपूर, अनुष्का शर्मा, अनिल कपूर, मनीष मल्होत्रा, निम्रत कौर, झोया अख्तर, दिया मिर्जा, नेहा धूपिया, नरगिस फकरी, सोनू सूद यांसह विविध बॉलिवूड कलाकारांनी त्या दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत
दरम्यान आलिया आणि रणबीर कपूर १४ एप्रिलला लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांच्या या विवाहसोहळ्याला दोघांचेही कुटुंबीय, काही मोजके नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होता. लग्नाच्या सर्व विधी पंजाबी रिती रिवाजाप्रमाणे पार पडल्या. सध्या या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत.