Priyanka Chopra Got Injured While Shooting : प्रियांका चोप्रा आज एक जागतिक आयकॉन बनली आहे. एक काळ असा होता जेव्हा ती बॉलीवूडमध्ये तिच्या अभिनयाची जादू पसरवत होती आणि नंतर तिच्या कारकिर्दीत काही अडचणी आल्या. त्यामुळे ती थेट हॉलीवूडमध्ये पोहोचली. टीव्ही शो, वेब सीरिज व चित्रपट केल्यानंतर आता ती जवळजवळ चार वर्षांनी भारतीय चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार आहे.

भारतीय चित्रपट करण्यापूर्वी प्रियांका चोप्राचा आगामी चित्रपट ‘हेड ऑफ स्टेट’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, अभिनेत्री जिमी फॅलनच्या चॅट शो ‘द टुनाइट शो’मध्ये तिच्या सहकलाकार जॉन सीना आणि इद्रिस एल्बा यांच्याबरोबर दिसली.

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राचा नवीन चित्रपट ‘हेड ऑफ स्टेट’ प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. अभिनेत्रीने एका शोदरम्यान या चित्रपटाशी संबंधित एक घटना शेअर केली आहे. त्यामध्ये तिने सांगितले आहे की, शूटिंगदरम्यान तिच्याबरोबर एक भयानक अपघात झाला. ‘हेड ऑफ स्टेट’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रियांका एक जबरदस्त स्टंट करत होती, तेव्हा एक घटना घडली.

या शोमध्ये प्रियांका चोप्राने भयानक क्षणाचा खुलासा केला. शूटिंगदरम्यान तिला इतकी दुखापत झाली की, तिच्या भुवया कापल्या गेल्या हे तिने उघड केले. जिमी फॅलनशी झालेल्या संभाषणात, देसी गर्ल म्हणाली, “कॅमेऱ्यात एक मॅट बॉक्स होता आणि मला जमिनीवर पडायचे होते आणि पाऊस पडत होता. कॅमेराला माझ्या जवळ यायचे होते .” प्रियांका चोप्रा पुढे म्हणाली, “म्हणून कॅमेरा ऑपरेटर थोडा जवळ आला – मी थोडी जवळ आले आणि त्याने माझ्या भुवईचा एक भाग कापला. जर ते थोडेसे खाली लागले असते, तर मी माझा डोळा गमावू शकले असते. म्हणून मी खूप आभारी आहे की, ते घडले नाही. माझा दिवस संपला होता. कारण- मला परत येऊन पुन्हा पावसात शूट करायचे नव्हते.”

प्रियंकाचा ‘हेड्स ऑफ स्टेट’ कधी प्रदर्शित होणार?

इल्या नैशुलर दिग्दर्शित ‘हेड्स ऑफ स्टेट’ हा अ‍ॅक्शन-कॉमेडी चित्रपट या वर्षी २ जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रियंकाबरोबर इद्रिस एल्बा व जॉन सीना मुख्य भूमिकेत आहेत. त्यात पॅडी कॉन्सिडाइन, स्टीफन रूट, कार्ला गुगिनो, जॅक क्वेड व सारा नाईल्स यांच्याही भूमिका आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.