scorecardresearch

प्रियांका चोप्राने रॉल्स रॉयस घोस्ट ही आलिशान गाडी ‘या’ व्यक्तीला विकली

प्रियांका सध्या अमेरिकत पती निक जोनससोबत आहे.

priyanka chopra, priyanka chopra rolls royce ghost car,
प्रियांका सध्या अमेरिकत पती निक जोनससोबत आहे.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांका एक आलिशान आयुष्य जगते. प्रियांकाला गाड्यांची आवड आहे. त्या गाड्यांपैकी एक म्हणजे रॉल्स रॉयस घोस्ट आहे. ती बऱ्याचवेळा या गाडीतून फिरताना दिसली आहे. ही गाडी फक्त बाहेरून आलिशान दिसत नाही तर आतूनही आलिशान आहे. प्रियांकाने तिच्या या गाडीत अनेक गॅजेस्ट आणि इन्टेरिअर केलं होतं. आता मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांकाने तिची ही आलिशान गाडी विकली आहे.

असं म्हटलं जातं की प्रियांकाने ही आलिशान गाडी २०१३ मध्ये विकत घेतली होती. ज्याच सुंदर रुफ आणि इन्टेरिअर आहे. तर प्रियांकाने ही गाडी बंगळुरुमध्ये असलेल्या एका व्यावसायिकाला ही गाडी विकली आहे.

आणखी वाचा : “मुस्लीम नाही तर काय झालं, नमाज पठण…”, लहान मुलीचे बोल ऐकून पल्लवी जोशीला बसला धक्का

आणखी वाचा : ‘कालचा एपिसोड बघून वाईट वाटलं ना…’, परी आणि मामीचा भन्नाट श्रीवल्ली डान्स पाहिलात का?

‘पिंकव्हिला’ने दिलेल्या रिपोर्टनुसार, प्रियांकाने ही आलिशान कार किती किंमतीत विकली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. प्रियांकाने तिची आवडती कार दीर्घकाळापासून गॅरेजमध्ये पडून असल्यामुळेच विकण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. प्रियांका लग्नानंतर अमेरिकेत शिफ्ट झाली असून तिथं ती आपला व्यवसाय आणि करिअरमध्ये व्यस्त आहे.

आणखी वाचा : “राज साहेबांनी ‘ते’ २ दिवसात करून दाखवलं…”, The Kashmir Files प्रकरणावरून केआरकेचा कॉंग्रेसला टोला

दरम्यान, प्रियांका ‘The Matrix: Resurrections’ या चित्रपटा दिसली होती. काही दिवसांपूर्वी प्रियांका आणि निकला सरोगसीच्या माध्यमातून एक मुलगी झाली आहे. प्रियांका लवकरच फरहान अख्कर दिग्दर्शित ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील असणार आहे. या व्यतिरिक्त टेक्ट फॉर यू’ आणि ‘सिटाडेल’ या वेबसीरिजमध्ये देखील ती दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Priyanka chopra sold off her rolls royce ghost to a banglore based businessman dcp

ताज्या बातम्या