मराठी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ठरत असलेला ‘मुळशी पॅटर्न’  सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटातील ‘आरारारा’ या गाण्यात स्थानिक गुंड झळकल्याचं समोर आल्यापासून हे गाणं चर्चेचा विषय ठरलं आहे. त्यातच आता चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच पुणे पोलिसांनी संदीप मोहोळ खून प्रकरणातील आरोपी गणेश मारणे आणि इतर गुंडांना न्यायालयाच्या आवारातून ताब्यात घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील मुळशी या गावाची ओळख गुन्हेगारांचं माहेर घर अशी असून लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटामध्ये काही गुन्हेगारांनीदेखील भूमिका केली आहे. त्यामुळे यात चित्रित केलेल्या काही घटना प्रत्यक्षात घडलेल्या असल्यामुळे चौकशीसाठी या परिसरातील अनेक गुन्हेगारांना गुन्हे शाखा २ येथे सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी ताब्यात घेतले आहे.

वाचा :

कुख्यात संदीप मोहोळ खुनातील गुंड गणेश मारणेसह अनिल खिलारे, इंद्रनील मिश्रा,रहीम शेख, संतोष लांडे, शरद विटकर,संजय कायगुडे, दत्ता काळभोर,नीलेश माझिरे यांच्यासह दहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. भानुप्रताप बर्गे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

दरम्यान, ‘मुळशी पॅटर्न’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शहरात वादग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ही कारवाई सुरु केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police arrest before release of mulshi pattern
First published on: 18-11-2018 at 10:00 IST