कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक अशी त्यांची ओळख होती. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर कन्नड सिनेसृष्टीसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार, दिग्दर्शक, क्रिकेटपटू, राजकारणातील दिग्गजांनी त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.

अभिनेता आर माधवनने ट्वीट करत पुनीत राजकुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “आमच्यातील सर्वात दयाळू, छान आणि उदात्त असलेला तो गेला. मला आता फार उद्धवस्त झाल्यासारखे वाटत आहे. तुम्ही आम्हाला फार गोंधळात टाकलं आहे. मला अजूनही आशा आहे की हे खरे नाही,” असे ट्वीट आर. माधवन याने केले आहे. तर अभिनेता सोनू सूदने “धक्कादायक, तुझी फार आठवण येईल,” अशा शब्दात शोक व्यक्त केला आहे.

“अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या आकस्मिक निधनामुळे खूप धक्का बसला. त्याने त्याच्या अभिनयामुळे अनेक लोकांची मने जिंकली होती. त्याच्या कुटुंबियाप्रती मी शोक व्यक्त करतो,” असे ट्वीट बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी केले आहे.

“आमचे लाडके पुनीत राजकुमार यांच्या निधनाबद्दल अत्यंत दु:ख झाले. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांप्रती मी शोक व्यक्त करतो. त्यांच्या चाहत्यांनी शांतता राखावी, अशी मी विनंती करतो,” असे ट्वीट माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी केले आहे.

“मला अजूनही विश्वास बसत नाही की पुनीत तू आम्हाला सोडून गेलास. हे चुकीचे आणि फार धक्कादायक आहे,” असे ट्वीट अभिनेता सिद्धार्थ याने केले आहे.

त्यासोबतच केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांनीही ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. पुनीत राजकुमार यांच्या निधनाबद्दल मी शोक व्यक्त करते. ते एक तेजस्वी तारा होते. त्यांचे कुटुंब, असंख्य चाहते यांच्याप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करते, असे निर्मला सीतारमन म्हणाल्या.

त्यासोबतच बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया हिनेही ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तिच्यासोबत अभिनेत्री हंसिका हिनेही ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.

पुनीत यांना आज (शुक्रवारी २९ ऑक्टोबर) दुपारी १ ते १.३० च्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्यांना तातडीने बंगळुरुतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरु होते. रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक त्याच्यावर सतत नजर ठेवून होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालवत गेली. बंगळुरुमधील विक्रम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. पुनीत राजकुमार यांच्या निधनाबद्दल रुग्णालयाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

I cannot process this. Cannot believe you’ve left us Puneeth. Kind, gifted, fearless…so much to give to the world. This is not fair brother. Heartbroken.

काय वाटत आहे हे मला माहित नाही. मला खूप उद्ध्वस्त वाटत आहे. भाऊ तुम्ही आम्हांला खूप गोंधळात टाकले आहे आणि मन मोडून टाकले आहे. आकाश आज उजळ आहे. मला अजूनही आशा आहे की हे खरे नाही.”

गेला- आमच्या दयाळू, छान आणि उदात्त आत्म्यापैकी एक. मला काय वाटत आहे हे मला माहीत नाही. मला खूप उद्ध्वस्त वाटत आहे. भाऊ तुम्ही आम्हांला खूप गोंधळात टाकले आहे आणि मन मोडून टाकले आहे. आकाश आज उजळ आहे. मला अजूनही आशा आहे की हे खरे नाही.