scorecardresearch

Premium

VIDEO : न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर सिद्धू मूसेवालांची गाणी, रस्त्यावर जमली गर्दी, चाहतेही झाले भावूक

सुप्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवालाचा ११ जूनला वाढदिवस होता. याचनिमित्त न्यूयॉर्क येथील टाइम्स स्क्वेअरवर त्याची गाणी दाखवण्यात आली.

sidhu moose wala wife, sidhu moose wala songs
सुप्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवालाचा ११ जूनला वाढदिवस होता. याचनिमित्त न्यूयॉर्क येथील टाइम्स स्क्वेअरवर त्याची गाणी दाखवण्यात आली.

सुप्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवालांच्या निधनाची बातमी ऐकताच संपूर्ण कलाविश्व हादरलं. ११ जूनला सिद्धू यांचा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धू मूसेवाला यांच्या कुटुंबियांना अनोखी भेट मिळाली आहे. ११ जूनला न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर सिद्धू यांची गाणी दाखवण्यात आली. याचदरम्यानचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा व्हिडीओ पाहून सिद्धू यांचे चाहते देखील भावूक झाले आहेत.

आणखी वाचा – VIDEO : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेता अजूनही राहतो चाळीत, शेअर केला घराचा व्हिडीओ

Anamika Bishnoi
प्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सरची पतीने गोळी झाडून केली हत्या; व्हिडिओ व्हायरल
Tania Sing Ends her Life
लोकप्रिय मॉडेलची आत्महत्या, शेवटच्या कॉलमुळे IPL मधला प्रसिद्ध खेळाडू अडचणीत
dance drama based on shivaji maharaj life
कोल्हापुरात नृत्यनाट्य मधून शिवरायांचे प्रसंग साकारले; एशिया पॅसिफिक बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्डमध्ये नोंद
There is a chaat shop in Bengaluru called ‘Ex-Girlfriend
‘एक्स गर्लफ्रेड!’ नावाने उघडले चाटचे दुकान! ब्रेकअपमधून बाहेर पडण्यासाठी मिळतो खास मेन्यू

सिद्धू यांचा हा २९वा वाढदिवस होता. वाढदिवस उत्साहात साजरा करायचा हे त्यांनी ठरवलं होतं. पण त्याचपूर्वी त्यांनी जगाचा निरोप घेतला. पण त्यांच्या वाढदिवसानिमित्त न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर सिद्धू यांची गाणी दाखवण्यात आली. त्यांच्या कुटुंबियांसाठी देखील हा भावूक क्षण होता. टाइम्स स्क्वेअरच्या या व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांची देखील बरीच पसंती मिळताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये टाइम्स स्क्वेअरवर सिद्धू मूसेवालांच्या गाण्यांचा व्हिडीओ पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रस्त्यात गर्दी जमली असताना सिद्धू यांना पाहण्यामध्ये लोक मग्न झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. सिद्धू यांचे खरं तर जगभरात चाहते आहेत. त्यांच्या गाण्यांना युट्यूबर लाखो लोकांची पसंती मिळाली आहे.

आणखी वाचा – Photos : सिद्धार्थ जाधवची कुटुंबाबरोबर दुबई ट्रिप, महागड्या गाडीची सफर अन् बरंच काही

सिद्धू मूसेवालांची २९ मे रोजी गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. मानसाच्या जवाहरके गावाजवळ सिद्धू मूसेवालांवर गोळीबार करण्यात आला. सुरक्षाव्यवस्था राज्य सरकारने काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांची हत्या करण्यात आली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Punjabi singer sidhu moose wala songs played at times square new york fans emotional tribute video viral on social media kmd

First published on: 13-06-2022 at 13:03 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×