Pushpa 3 Poster Viral : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या बहुचर्चित चित्रपट ‘पुष्पा २: द रूल’ येत्या ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पुष्पा’ सिनेमाचा दुसरा भाग अजून चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला नसताना आता ‘पुष्पा’ सिनेमाचा तिसरा भाग सुद्धा येणार अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

‘पुष्पा’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दलच्या चर्चेला अखेर दुजोरा मिळाला आहे. या तिसऱ्या भागाचे नाव ‘पुष्पा ३: द रॅम्पेज’ असे असून त्याचा पोस्टरही समोर आला आहे. या घोषणेनंतर चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. तर तिसऱ्या भागात दाक्षिणात्य सिनेमातील मोठा स्टार महत्त्वाची भूमिका बजावणार आहे असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा…Pushpa 2 : हिंदी डबसाठी पुन्हा एकदा मराठमोळ्या श्रेयस तळपदेचा आवाज! अल्लू अर्जुनबद्दल म्हणाला, “आत्मविश्वास, स्वॅग अन्…”

‘पुष्पा ३’ची अधिकृत घोषणा ?

चित्रपट समीक्षक मनोबाला विजयबालन यांनी त्यांच्या एक्स हँडलवर (पूर्वीचे ट्विटर) एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ऑस्कर विजेते साउंड डिझायनर रेसुल पुकुट्टी आणि काही लोक ‘पुष्पा ३’ शीर्षकाच्या पोस्टर समोर उभे आहेत. या फोटोमध्ये मोठ्या अक्षरांत ‘पुष्पा ३’ असे स्पष्ट लिहिलेले दिसत आहे. विशेष म्हणजे, रेसुल पुकुट्टी यांनी हाच पोस्टर फोटो आधी शेअर केला होता, मात्र नंतर त्यांनी हा फोटो असणारी सोशल मीडियावरील पोस्ट डिलीट केली.

२०२२ मध्ये अभिनेता विजय देवरकोंडाने (Vijay Deverkonda) दिग्दर्शक सुकुमार (Sukumar) यांच्या वाढदिवसानिमित्त तिसऱ्या भागाबद्दल अप्रत्यक्षपणे संकेत दिले होते. त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील भागाची घोषणा आधीच अपेक्षित होती.

हेही वाचा…Video : अल्लू अर्जुनचं मराठी ऐकलंत का? अभिनेत्याने मुंबईकरांशी साधला मराठीत संवाद, म्हणाला…

‘पुष्पा ३’मध्ये मोठा ट्विस्ट?

‘पुष्पा ३’मध्ये विजय देवरकोंडा व्हिलनच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत. काहींनी असेही अनुमान लावले आहे की विजय हा अल्लू अर्जुनच्या मुलाच्या भूमिकेतही दिसू शकतो. मात्र, याची अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली नाही. विजयने २०२२ मध्ये पुष्पा सिनेमांच्या दोन्ही भागाचे दिग्दर्शक सुकुमार यांच्याबरोबर एक फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आणि त्यांच्या बरोबर नवा सिनेमा करण्यास तो उत्सुक आहे असे लिहिले होते. यात ‘द राईज’, ‘द रूल’ आणि ‘द रॅमपेज’ असा उल्लेख होता. ‘द राईज’ आणि ‘द रुल’ हे अनुक्रमे पुष्पा १ आणि पुष्पा २ या सिनेमांची नावे आहेत. आणि आता इंटरनेटवर व्हायरल झालेल्या फोटोमध्येही पुष्पाच्या तिसऱ्या भागाचे नाव ‘पुष्पा द रॅमपेज आहे. जे नाव विजय देवरकोंडाने दोन वर्षांपूर्वी केलेल्या ट्विटमध्ये दिसून आले होते. या सर्व गोष्टींना एकत्र जोडून पुष्पाचा तिसरा भाग येणार असा अंदाज चाहते लावत आहेत.

हेही वाचा…Pushpa 2 : चित्रपटातील धमाकेदार गाणं प्रदर्शित, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा Peelings वर एनर्जेटीक डान्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता ‘पुष्पा ३’चा पोस्टर समोर आल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगू लागली आहे. अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा’ मालिकेचा तिसरा भाग भारतात बनलेल्या सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक असेल, असे सांगितले जात आहे. सध्या ‘पुष्पा २: द रूल’ची प्रतीक्षा लवकरच संपणार असून हा चित्रपट ५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.