बॉलिवूड अभिनेत्री सुरवीन चावला आणि आरमाधवन यांचा Decoupled ही सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ते दोघे ही या सीरिजचे प्रमोशन करत आहेत. यावेळी त्यांनी एका मुलाखतीत बेडरुम सिक्रेट सांगितलं आहे.

सुरवीन आणि आर माधवनने नुकतीर पीपिंगमूनला मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांना सेक्स लाइफला मसालेदार बनवण्यासाठी काय केलं पाहिजे असा प्रश्न विचारण्यात आला आहे. यावेळी सुरवीन बोलते, “चिंचेची चटणी” आणि त्यानंतर ती जोर-जोरात हसू लागते. तर आर माधवन तिचं हे बोलणं ऐकून हसायला लागतो. दोघंही इतका वेळ हसतात की, त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात. यानंतर आर माधवन सांगतो की, “चिंचेची चटणी लैंगिक जीवनात मसाला आणेल की नाही माहित नाही, पण चाखायला मजा येईल.” हे ऐकून दोघंही पुन्हा हसू लागतात. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : फोटो काढण्यासाठी आलेल्या पोलिसाला हटकल्यानंतर ; अक्षयने केलेल्या कृत्याचे होतयं कौतुक

आणखी वाचा : “मी आता हे करू शकत नाही…”, लग्नाच्या एक महिन्यानंतर जिनिलियाने रडत रडत रितेशकडे केली होती तक्रार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘डीकप्लड’ ही वेब सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये ते दोघे विभक्त झालेल्या जोडप्याची भूमिका साकरत आहेत. पण त्यांच्या मुलीच्या आनंदासाठी ते एकत्र राहतात.