आर. माधवनचा ‘रॉकेट्री : द नांबी इफेक्ट’ हा चित्रपट १ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट २५ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आला होता. पण नुकतंच ट्विटरवर एका व्यक्तीने पोस्ट केले, या चित्रपटासाठी निधी मिळवण्याच्या प्रयत्नात आर. माधवनने आपले घर गमावले. हे ट्विट भरपूर व्हायरल झाले आणि सर्वांचा समज झाला की, ‘रॉकेट्री’ बनवण्यासाठी आर माधवनने खरोखर घर विकले. अखेर खुद्द आर माधवनने याबाबत स्पष्टीकरण देत याबद्दल सुरु असलेल्या चर्चांना पूर्णवीराम दिला आहे.

हेही वाचा : अखेर प्रतीक्षा संपली..’या’ दिवशी येणार अभिनेता ईशान खट्टरचा ‘पिप्पा’

एका युजरने ट्विटरवर अलीकडे पोस्ट केले की, आर माधवनने चित्रपटासाठी निधी गोळा करताना त्याचे घर गमावले. त्याने लिहिले, “आर माधवनला ‘रॉकेट्री’ तयार करण्यासाठी आपले घर गमावावे लागले आधी जो दिग्दर्शक हा चित्रपट दिग्दर्शित करणार होता त्याने त्याच्या काही कमिटमेंट्समुळे ‘रॉकेट्री’ चित्रपटातून माघार घेतली. त्यामुळे आर माधवनने हा चित्रपट दिग्दर्शित केला. तर दुसरीकडे त्याचा मुलगा, वेदांत, पोहण्यात देशासाठी पदके जिंकत आहे. मॅडीला सलाम!”

यावर आर माधवनने ट्विट करत खरं काय ते सांगितलं आहे. त्याने लिहिले, “कृपया माझ्या त्यागाचा अतिरेक करू नका. मी माझे घर किंवा काहीही गमावलेले नाही. खरं तर ‘रॉकेट्री’मध्ये सामील असलेले सर्वजण यावर्षी खूप अभिमानाने भरपूर आयकर भरतील. आम्ही सर्वांनी खूप चांगला आणि अभिमानास्पद नफा या चित्रपातातून कमावला. मी अजूनही माझ्याच घरात राहतो आणि माझ्या घरावर माझं खूप प्रेम आहे.”

आणखी वाचा : आर. माधवनने रचला नवा विक्रम, सलमान खान, शाहरुख खान यांनाही टाकले मागे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’ हा चित्रपट इस्रोचे एरोस्पेस इंजिनियर नांबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे. आर. माधवनच्या दिग्दर्शक म्हणून पहिल्या ‘रॉकेट्री : द नांबी इफेक्ट’ या चित्रपटाला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे ओटीटीवरही हा चित्रपट ट्रेंडींगवर असल्याचे पाहायला मिळत आहे.