चित्रपटामध्ये काम करायचं असेल तर आपण कसे दिसतो? आपली शरीरयष्टी कशी आहे? याकडे अधिक लक्ष दिलं जातं. हे कोणत्या ना कोणत्या कलाकाराच्या तोंडून तुम्ही ऐकलं असेल. अभिनेत्री राधिका आपटेने आता बॉलिवूडमधील धक्कादायक सत्य सांगितलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राधिकाने चित्रपट करत असताना आलेल्या वाईट अनुभवाबाबत खुलेपणाने सांगितलं.

आणखी वाचा – ‘सम्राट पृथ्वीराज’च्या अपयशानंतरही अक्षयची गाडी सुसाट, निर्मात्याचं मात्र १०० कोटींपेक्षा अधिक नुकसान

राधिकाला अलिकडेच एका प्रसंगाला सामोरं जावं लागलं. विचित्र कारणं देत बऱ्याच चित्रपटांसाठी राधिकाला नाकारण्यात आलं. याबाबत तिने स्वतः सांगितलं आहे. Film Companionला दिलेल्या मुलाखतीमध्ये राधिकाने सांगितलं की, “काही दिवसांपूर्वीच मला एका चित्रपटासाठी नाकारण्यात आलं. याचं कारण देखील फार विचित्र होतं. माझ्या तुलनेमध्ये दुसऱ्या अभिनेत्रीचे ओठ आणि शरीराची ठेवण अधिक चांगली होती. दुसरी अभिनेत्री तुझ्यापेक्षा अधिक आकर्षक दिसेल आणि ती खूप चालेल असं मला सांगण्यात आलं.”

आणखी वाचा – विमानामध्ये पूजा हेगडेबरोबर घडला विचित्र प्रकार, इंडिगोच्या कर्मचाऱ्याने दिली वाईट वागणूक

राधिकाला तिच्या करिअरच्या सुरुवातीला देखील अनेक वाईट अनुभव आले. शरीररचनेवर काम करण्याची गरज आहे असा सल्ला देखील तिला देण्यात आला होता. राधिकाने याबाबत सांगितलं, “जेव्हा मी या क्षेत्रात नवीन होते तेव्हा मला माझ्या शरीरयष्टीवर काम करण्याचा सतत सल्ला दिला जायचा. सुरुवातीला मी दबावाखाली जगले. पहिल्याच भेटीमध्ये नाकाची सर्जरी कर असं मला सांगण्यात आलं. तर दुसऱ्या भेटीमध्ये स्तनाची सर्जरी करण्याचा सल्ला देण्यात आला.”

आणखी वाचा – “महाराष्ट्रात आत्ताच पळून यावं वाटतं कारण…”, हिमाचल प्रदेशमध्ये गेलेली प्राजक्ता माळी असं का म्हणाली?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे बोलताना ती म्हणाली, “हे सत्र पुढेही तसंच सुरु राहिलं. सर्जरी कर असा सल्ला मी कित्येकदा ऐकला. केसांना कलर करायलाच मला तीस वर्ष लागली. पण या गोष्टींसाठी मी साधं इंजेक्शन देखील घेणार नाही. मला ह्या सगळ्या गोष्टी ऐकून खूप राग यायचा. पण यामुळे मी माझ्या शरीरावर अधिक प्रेम करु लागले.” राधिकाचा ‘फॉरेंसिक’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. अभिनेता विक्रांत मेसीबरोबर ती या चित्रपटात काम करताना दिसेल.