Patralekhaa Advises Young Girls Over Egg Freezing : राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या घरी लवकरच एक छोटासा पाहुणा येणार आहे. ९ जुलै रोजी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून या जोडप्याने पत्रलेखाच्या गरोदरपणाची आनंदाची बातमी दिली.
आता पत्रलेखाने तिच्या गरोदरपणाच्या प्रवासाबद्दल सांगितले आहे. पत्रलेखाने सांगितले की, जरी ती नैसर्गिकरित्या गर्भवती झाली असली तरी काही वर्षांपूर्वी तिने तिचे बीजांड गोठवले होते, जी खूप कठीण प्रक्रिया होती.
बीजांड गोठवणे ही खूप कठीण प्रक्रिया होती : पत्रलेखा
खरंतर, सोहा अली खानशी तिच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना पत्रलेखा म्हणाली, “मी ही सुमारे तीन वर्षांपूर्वी माझे बीजांड गोठवले होते आणि आता मी गर्भवती आहे, मला वाटते की बीजांड गोठवण्यापेक्षा गर्भधारणा खूप सोपी आहे. माझ्या डॉक्टरांनी मला सांगितले नव्हते की ते किती कठीण असेल.”
ती पुढे म्हणाली, “तसेच जेव्हा माझे बीजांड गोठवण्याचे काम झाले तेव्हा मला वाटणारे दुःखदेखील कमी झाले, म्हणून या दोन्ही प्रक्रियेदरम्यान मी नेहमीच तरुण मुलींना गर्भवती राहण्याची शिफारस करेन. त्या संपूर्ण प्रक्रियेतून जाण्यापेक्षा हे खूप सोपे आहे.”
ऑक्टोबर २०२१ मध्ये राजकुमारने पत्रलेखाला एका कार्यक्रमात प्रपोज केले आणि एका महिन्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी, दोघांनी चंदीगडमध्ये लग्न केले, त्यांच्या लग्नाला जवळचे मित्र आणि कुटुंब उपस्थित होते. त्याआधी ते अनेक वर्ष एकमेकांना ओळखत होते. लग्नानंतर चार वर्षांनी पत्रलेखाने गुडन्यूज दिली आहे.
अभिनेता लवकरच बाबा होणार असून त्याची पत्नी पत्रलेखा आई होणार आहे. राजकुमार रावने चाहत्यांना ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली होती. राजकुमार रावने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिलं होतं की, ‘बेबी ऑन द वे… मी खूप उत्साहात आहे’, असं कॅप्शन त्याने लिहिलं होतं.