शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अनेक कलाकार त्याच्या समर्थनासाठी पुढे येत आहेत. त्यात फक्त कलाकार नाही तर संगीत विशाल दादलानी देखील आहे. नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री राखी सावंत देखील शाहरुखचे समर्थन करत पुढे आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत राखीने शाहरुखचा मुलगा आर्यन खानसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.

राखीने ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून केली आहे. या व्हिडीओत मला फार दु:ख झालं आहे. “आपण सगळे मिळुन प्रार्थना करूया की आर्यनची लवकरच सुटका होईल. काय सत्य आहे हे मला माहित नाही, कोण कोणाला फसवत आहे. मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे, जर तुम्ही वाघ आहात तर वाघाशी लढा, गिधाड बनून मुलाचे शिकार नका करू,” असे राखी त्या व्हिडीओमध्ये म्हणाली आहे. राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : “जेव्हा माझ्या ११ वर्षाच्या मुलाचे निधन झाले तेव्हा शाहरूख…”, शेखर सुमनचे ट्वीट व्हायरल

आणखी वाचा : बिग बींनी जलसाजवळील जागा SBI ला दिली भाडेतत्वावर, भाडं ऐकून येईल चक्कर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आर्यन खानची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे. त्याच्यासोबत इतर पाच आरोपींना आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले. पुढील १५ दिवस आर्यनला जेलमधील सर्व नियम पाळावे लागणार आहेत. येत्या पाच दिवस आर्यनचा मुक्काम आर्थर रोड जेलमध्ये असणार आहे. यावेळी जेलमध्ये आर्यन खानला कोणतीही खास ट्रीटमेंट दिली जाणार नाही. त्याला इतर कैद्यांप्रमाणेच वागवले जाईल. तसेच न्यायालयाच्या आदेशापर्यंत त्याला बाहेरचे काहीही अन्न मिळणार नाही. त्यांना फक्त तुरुंगाचे अन्न दिले जाणार आहे.