दाक्षिणात्य अभिनेता राम-चरण आणि त्याची पत्नी उपासना हे दोघेही सध्या चांगलेच चर्चेत आहेत. हे दोघे लवकरच आई-बाबा होणार आहेत. त्यांचे चाहते आणि कुटुंबीयांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान राम चरणने त्याला मुलगीच होणार आहे अशी कल्पना दिली आहे. राम चरणच्या तोंडून चुकून अशी गोष्ट सांगितली गेली आहे ज्यामुळे तो चर्चेत आला आहे. यावरून राम चरण आणि उपासना यांना कन्यारत्नच होणार असल्याची चर्चा सध्या रंगताना दिसत आहे.

१५ डिसेंबर २०२२ रोजी उपासनाने गरोदर असल्याची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केली होती. नुकतंच राम चरण आणि उपासना यांच्या घरी डोहाळे जेवणाचा एक कार्यक्रम ठेवण्यात आला, याचे फोटोजही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. याचदरम्यान राम चरणने दिलेल्या एका मुलाखतीची क्लिपसुद्धा व्हायरल होत आहे. राम चरण या मुलाखतीमध्ये म्हणाला, “माझी पाहिली प्रिय व्यक्ती उपासना आहे त्यानंतर माझा पाळीव कुत्रा आणि त्यानंतर माझी तिसरी अत्यंत प्रिय आणि लाडकी लवकरच आमच्या आयुष्यात येणार आहे.”

आणखी वाचा : भूमिका चावलाच्या हातून निसटला होता ‘जब वी मेट’; याविषयी खंत व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली…

राम चरणच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर या चर्चेला उधाण आलं आहे. इतकंच नव्हे तर नुकत्याच पार पडलेल्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात उपासनाने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. सर्वसाधारणपणे हा रंग मुलींचा आवडता असतो असं म्हंटलं जातं. याबरोबरच या कार्यक्रमासाठी बेबी पिंक कलर थीम ठरवण्यात आली होती. यावरूनच या जोडप्याला मुलगीच होणार असल्याची चर्चा होताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अद्याप राम चरण किंवा उपासना यांनी त्यांच्या होणाऱ्या बाळाची लिंग तपासणी केल्याबद्दल कुठेही वाच्यता झालेली नाही, किंवा त्यांनीदेखील याबद्दल कुठेच भाष्य केलेलं नाही. मध्यंतरी ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये उपासनाने त्यांच्या फॅमिली प्लॅनिंगबद्दल भाष्य केलं होतं. लग्नाच्या तब्बल १० वर्षांनी या दोघांनी फॅमिली प्लान करायचा विचार केला असंही उपासनाने या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.