दाक्षिणात्य स्टार राम चरणने त्याच्या कारकिर्दीत आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. शुक्रवारी लंडनमधील प्रतिष्ठित ‘मादाम तुसा वॅक्स म्युझियम’मध्ये त्याने त्याच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण केले. चिरंजीवी, सुरेखा आणि उपासना कोनिडेला यांनीही या खास क्षणाला हजेरी लावली. विशेष म्हणजे केवळ राम चरणच नाही तर संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा पाळीव श्वान राइमची प्रतिकृतीही बनवली आहे.
मादाम तुसा वॅक्स म्युझियममधील राम चरणच्या मेणाच्या पुतळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये राम चरण त्याचा पाळीव श्वान राइमसह मादाम तुसा स्टेजवर मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करताना दिसत आहे. या मेणाच्या पुतळ्यात तो सोफ्यावर बसलेला आहे. त्याचा लाडका श्वान राइमदेखील त्याच्या शेजारी आहे. दोघांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
राम चरणने स्वतः या पुतळ्यावरील पडदा हटवला. यावेळी त्याचे आई-वडील चिरंजीवी आणि सुरेखा, पत्नी उपासना आणि त्याचा पाळीव श्वान राइम हे देखील उपस्थित होते. म्युझियममध्ये जाण्यापूर्वी, रामच्या चाहत्यांनी त्याचं जोरदार स्वागत केलं.
राम चरणच्या मेणाच्या पुतळ्यामध्ये काय खास आहे?
राम चरण हा जगातील पहिला अभिनेता आहे, ज्याच्या मेणाच्या पुतळ्यात त्याचा पाळीव श्वानदेखील आहे. अनावरणाच्या वेळी, राम चरणने प्रसारमाध्यमांबरोबर खास फोटोसेशन केलं. राइमच्या गोंडसतेने लोकांची मने जिंकली आहेत.
Here it is ???????#RamCharanWaxStatue ?❤️✊?@AlwaysRamCharan x @MadameTussauds pic.twitter.com/jWaiITgEJo
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— YJN Photography (@yjn_photography) May 10, 2025
राम चरणच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, RRR सिनेमानंतर राम चरणकडे सध्या विविध सिनेमांच्या ऑफर आहेत. लंडनहून परतल्यानंतर राम चरण त्याच्या ‘पेद्दी’ चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा सुरू करेल. या चित्रपटात राम व्यतिरिक्त शिवा राजकुमार, जान्हवी कपूर आणि दिव्येंदु शर्मा हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन बुची बाबू सना करत आहेत आणि चित्रपटाला मधुर संगीत ए. आर. रहमान यांनी दिले आहे. या चित्रपटापूर्वी राम ‘गेम चेंजर’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात तो कियारा अडवाणीबरोबर दिसला होता.