सिनेरसिक ख्रिस्तोफर नोलनच्या चित्रपटांची फारच आतुरतेने वाट पहात असतात. त्याच्या चित्रपटाची क्रेझ आपल्या भारतातही प्रचंड बघायला मिळते. नुकताचा त्याचा ‘ओपनहायमर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भारतात गेले काही दिवस या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती. अणूबॉम्बचे जे. रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला आहे.

भारतात या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत असून सामान्य प्रेक्षक, नोलनचे चाहते तसेच चित्रपट समीक्षक यांनी या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे. बॉलिवूडमधील मंडळीसुद्धा नोलनच्या या चित्रपटाचं कौतुक करताना दिसत आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीसुद्धा ट्वीटच्या माध्यमातून ‘ओपनहायमर’चं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा : सेक्स करताना भगवद्गीतेचं वाचन; ‘ओपनहायमर’मधील त्या सीनवर भडकले नेटकरी; म्हणाले “लाज वाटली…”

राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटाचं आणि नोलनच्या दिग्दर्शनाचं तर कौतुक केलंच पण आपल्या भारतीय फिल्ममेकर्सचेही त्यांनी कान खेचले आहेत. आपल्या ट्वीटमध्ये राम गोपाल वर्मा म्हणाले, “नोलन हा असा एकमेव दिग्दर्शक आहे जो प्रेक्षकांच्या डोक्यातील हुशारीचा शोध घेतो, त्यांच्या मेंदूला खाद्य पुरवतो, आणि आपल्याकडचे फिल्ममेकर्स प्रेक्षकांना मूर्ख समजून त्या मूर्खपणाला खतपाणी घालतात.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मिशन इम्पोसीबल ७’ आणि ‘फास्ट एक्स’ या दोन्ही चित्रपटांना मागे टाकत ‘ओपनहायमर’ भारतात पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.ओपनहायमर यांनी हिंदू धर्मातील वेद आणि भगवद्गीतेचा प्रचंड अभ्यास केला होता, चित्रपटातही या गोष्टीचा उल्लेख दोन ठिकाणी आला आहे. चित्रपटात ओपनहायमर यांची भूमिका अभिनेता सिलियन मर्फीने केली आहे. त्याच्याबरोबरच रॉबर्ट डाउनी ज्युनिअर, मॅट डॅमन, एमिली ब्लंट, रामी मलिक यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.