अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी आज अखेर विवाहबंधनात अडकली. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांचा विवाहसोहळा पार पडला. या दोघांच्या लग्नाबद्दल गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगल्या होत्या. अखेर आज १४ एप्रिल २०२२ रोजी त्यांचे लग्न निर्विघ्नपणे पार पडले आहे. दरम्यान नुकतंच आलियाने त्यांच्या लग्नाचे विविध फोटो पोस्ट केले आहे. त्यांच्या या फोटोवर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी यांनीही यावर कमेंट केली आहे.
केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी या सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. त्या नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतंच स्मृती इराणी यांनी आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या फोटोंवर कमेंट केली आहे. आलिया आणि रणबीरच्या फोटोवर कमेंट करताना स्मृती इराणी म्हणाल्या, अभिनंदन. देव तुमचे भले करो. स्मृती इराणी यांची ही कमेंट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आलिया आणि रणबीरने ऑफ व्हाइट रंगाचे कपडे परिधान केले आहेत. हे फोटो शेअर करताना ती म्हणाली “आज आमच्या कुटुंब आणि मित्रमंडळींनी समोर घरातील बाल्कनीत जिथे आम्ही पाच वर्षे पूर्ण केले. तिथेच आमच्या आवडत्या ठिकाणी लग्न केले.
आमच्यासोबत बऱ्याच आठवणी असताना आता आणखी आठवणी तयार करण्यासाठी प्रतिक्षा करु शकतं नाही. आमच्या आयुष्यातील या अत्यंत महत्त्वाच्या काळात तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. त्यामुळे हा क्षण अधिक खास झाला आहे. प्रेम, रणबीर आणि आलिया, असे आलियाने म्हटले आहे. सध्या त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
रणबीर कपूरच्या लग्नावर एक्स गर्लफ्रेंड दीपिका पदुकोणनं अखेर सोडलं मौन, प्रतिक्रिया चर्चेत
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या विवाहसोहळ्यासाठी कुटुंबातील व्यक्तींसह अनेकांनी हजेरी लावली. यावेळी करीना कपूर, करिश्मा कपूर, पूजा भट्ट, आकाश अंबानी यांसह अनेक सिनेसृष्टीतील कलाकारही उपस्थित होते. रणबीर आणि आलियाच्या लग्नामुळे कपूर आणि भट्ट या दोन्हीही कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.