आजचा (१४ एप्रिल) दिवस कपूर आणि भट्ट कुटुंबासाठी फारच खास आहे. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट. रणबीर आणि आलिया आज विवाहबंधनात अडकणार आहेत. ते दोघेही आज दुपारी २ वाजता सप्तपदी घेण्याची शक्यता आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या तारखेवरुन बराच गोंधळ उडाला होता. अखेर ते दोघेही आज लग्नबंधनात अडकणार आहेत.

ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आलिया आणि रणबीर यांच्या लग्नाच्या विधी १४ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता सुरु होतील. यानंतर संध्याकाळपर्यंत रणबीर आणि आलिया सप्तपदी घेणार आहेत. सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट मिकी कॉन्ट्रॅक्टर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाची तयारी करत आहेत. मिकी कॉन्ट्रॅक्टरने आतापर्यंत शिल्पा शेट्टी, काजोल आणि प्रियांका चोप्रासह अनेक सेलिब्रिटींना स्टाइल केले आहे. आलिया आणि रणबीर त्यांच्या लग्नात प्रसिद्ध डिझायनर सब्यसाचीचे पोशाख घालणार आहेत.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांच्या लग्नाच्या विविध चर्चा समोर आल्या होत्या. काही प्रसारमाध्यमांनी ते दोघेही १७ तारखेला विवाहबंधनात अडकतील, असे म्हटले होते. तर काहींनी ते दोघेही १७ ते २० एप्रिलदरम्यान लग्न करणार असल्याचे वृत्त दिले होते. मात्र नुकतंच रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनी त्यांचे लग्न आज असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Alia- Ranbir Wedding : रणबीर आणि आलियाच्या लग्नाची तारीख समोर, नव्या सूनबाईंबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर नीतू कपूर म्हणाल्या…

आलिया आणि रणबीरच्या लग्नाची तारीख लीक झाल्यामुळे कुटुंबियांनी ती बदलण्याचा निर्णय घेतल्याचे बोललं जात आहे. आलिया आणि रणबीरचा हळदी आणि मेहंदी समारंभ काल १३ एप्रिल ‘वास्तू’मध्येच पूर्ण विधींसह पार पडला. यावेळी संपूर्ण कपूर आणि भट्ट कुटुंबाने हजेरी लावली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासोबत आलिया आणि रणबीरच्या जवळच्या मित्रांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी करण जोहर, श्वेता बच्चन हे देखील उपस्थित होते. रणबीरच्या लग्नाची वरात कृष्णराज बंगल्यातून निघणार आहे. त्यानंतर वांद्र्यातील वास्तू या ठिकाणी ते दोघेही सप्तपदी घेतील.