अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी एकामेकांना ५ वर्ष डेट केल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. १४ एप्रिलला या दोघांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. लग्नानंतर दोघंही त्यांच्या कामात व्यग्र झाले आहेत. पण रणबीर आलियाच्या लग्नानंतर कपूर कुटुंबात काय बदल झाले याचा खुलासा एका मुलखातीत केला आहे. आलिया कपूर कुटुंबाचा भाग झाल्यानंतर घरात आणि विशेषतः त्यांचा मुलगा रणबीरच्या आयुष्यात बरेच बदल झाल्याचं नीतू कपूर यांचं म्हणणं आहे.

नीतू कपूर ‘ई- टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मुलगा आणि सुन आलियाबद्दल बोलताना म्हणाल्या, “मी आज खूप खुश आहे. आलियानं सर्वांनाच खूप प्रेम आणि आपुलकी दिली आहे. विशेषतः मला रणबीरमध्ये खूप बदल जाणवतायत. ते दोघं एकत्र खूपच चांगले दिसतात. आलिया आमच्या कुटुंबाचा भाग झाली आहे. ज्याचा मला खूप अभिमान वाटतो. मी त्याबाबत स्वतःला खूप लकी मानते. ती घरात आल्यानंतर सगळं काही बदलून गेलंय.”

आणखी वाचा- एक्स गर्लफ्रेंड साराला पाहून कार्तिकने केले असे काही, व्हिडीओ होतोय व्हायरल

दरम्यान आलिया आणि रणबीरच्या लग्नाबाबत बोलायचं तर त्यांचं लग्न अतिशय खासगी ठेवण्यात आलं होतं. या लग्नात फक्त ४० लोकांना निमंत्रण देण्यात आलं होतं. रणबीर आणि आलियानं खूप साध्या पद्धतीने लग्न केलं होतं. यावर नीतू कपूर म्हणाल्या, “यामुळे एक ट्रेंड सेट झाला आहे. अनेकांसाठी हे एक उत्तम उदाहरण आहे. लग्नात तुम्हाला खूप पैसा खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही लग्न अशा ठिकाणी करा जिथे तुम्ही खूप खुश असाल आणि तुमचं कुटुंब हे एन्जॉय करू शकेल.”

आणखी वाचा- शिल्पा शेट्टी स्वतःपेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेत्याच्या प्रेमात? म्हणाली “माझं त्याच्यावर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नीतू कपूर यांच्या कामाबद्दल बोलायचं तर त्या बऱ्याच मोठ्या काळानंतर पुन्हा चित्रपटात दिसणार आहेत. त्या लवकरच ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटातून कमबॅक करत आहेत. येत्या २४ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होत असून यात कियारा आडवाणी, वरुण धवन आणि अनिल कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर आलिया आणि रणबीर यांचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.